हा प्रसिद्ध क्रिकेटपटू झाला निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन

 हा प्रसिद्ध क्रिकेटपटू झाला निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाकडून २०२४ च्या लोकसभा निवडणूकीची जय्यद तयारी सुरु आहे. मतदारांचा टक्का वाढावा म्हणून आयोगाकडून विशेष प्रयत्न केले जातात. निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरची उद्यापासून निवडणूक आयोगाचा (EC) “नॅशनल आयकॉन” म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तेंडुलकर आणि निवडणूक पॅनल यांच्यात उद्या दिल्लीत सामंजस्य करार होणार आहे. तीन वर्षांच्या करारांतर्गत तेंडुलकर मतदारांमध्ये जनजागृती करणार आहेत.

निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, “आगामी निवडणुकांमध्ये, विशेषतः सार्वत्रिक निवडणुका (लोकसभा) 2024 मध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी युवकांमधील तेंडुलकरच्या अद्वितीय प्रभावाचा फायदा घेण्याच्या दिशेने हे सहकार्य एक महत्त्वाचे पाऊल असेल.” सचिन तेंडुलकर बुधवारी ECI सोबत राष्ट्रीय आयकॉन म्हणून त्याच्या नवीन इनिंगची सुरुवात करेल. या संदर्भात ऑल इंडिया रेडिओ, नवी दिल्ली येथील रंग भवन येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी आयोगाने अभिनेता पंकज त्रिपाठी यांना नॅशनल आयकॉन म्हणून मान्यता दिली होती. यापूर्वी, 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, एमएस धोनी, आमिर खान आणि मेरी कॉम सारख्या दिग्गजांना निवडणूक आयोगाचे नॅशनल आयकॉन होण्याचा मान मिळाला होता. आता यावेळी क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आणि भारतरत्न पुरस्कार विजेता सचिन तेंडुलकरची नॅशनल आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे.

SL/KA/SL

22 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *