पाकिस्तानचे झेंड्यांची विक्री करणाऱ्या अमेझॉन कंपनीची तोडफोड

नागपूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानचे झेंडे ऑर्डर करा 24 तासात तुम्ही तुम्हाला घरपोच देऊ अशा पद्धतीने ॲमेझॉन कडून पाकिस्तानचे झेंडे विक्री केल्या जात असल्यामुळे आज नागपुरात मनसे सह विविध सामाजिक संघटनातर्फे संताप व्यक्त करण्यात आला…
यासंदर्भात अमेझॉन कंपनी आणि पोलिसांना निवेदन सुद्धा देण्यात आले होते मात्र तरीही ही विक्री थांबवण्यात आली नसल्याने आज संतप्त होत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी नागपुरातील बैधनाथ ॲमेझॉन चौकातील कार्यालयात घुसून प्रचंड तोडफोड केली. यावेळी कार्यकर्ते, नागरिकांनी अमेझॉन कंपनी चा विरोधात घोषणाबाजी करीत वंदे मातरम, भारत माता की जय चा घोषणा दिल्या. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
ML/KA/SL
22 Aug 2023