Month: April 2023

पर्यटन

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्र्यांच्या हस्ते मिलेट्स फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या २०२३ या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षांनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. 2023 या वर्षासाठी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या भारताच्या अध्यक्षपदा अंतर्गत, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने, मुंबईत ताजमहाल पॅलेस हॉटेल इथे 13 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत “SCO […]Read More

राजकीय

ठाकरेंचा सध्या दार खटखटवण्याचा कार्यक्रम सुरू

मुंबई , दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जेव्हा उध्दव ठाकरे , आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हिंदुत्ववादी होते तेव्हा, दार उघड बये दार.. हे जगदंबे चरणी गाणे म्हणत होते. मात्र जेव्हा पासून त्यांनी हिंदुत्व सोडले त्या दिवसापासून ते दार खटखटाव भाई दार खटखटाव असा कार्यक्रम करीत आहेत. कधी ते तेजस्वी यादव, कधी केजरीवाल, कधी टिआरएस अशाच […]Read More

महानगर

आली शासकीय योजनांची जत्रा, मिळणार विविध योजनांचे लाभ

मुंबई , दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा उद्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. १५ जून पर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून एकंदर २७ लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करावे […]Read More

पर्यावरण

आता व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून संवर्धन साधण्यासाठी व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. राज्यातील वन्य हत्ती नियंत्रणासाठी हत्ती संवादकाची मदत घेण्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात […]Read More

ट्रेण्डिंग

उद्यापासून दिल्लीत मोफत वीज नाही, काय आहे कारण

नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडून नागरिकांना विविध प्रकारची अनुदाने दिली जातात. यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेले वीजेचे अनुदान आजपासून बंद होणार आहे. म्हणजेच उद्यापासून अनुदानित बिले दिली जाणार नाहीत. ही सबसिडी थांबवली आहे कारण आप सरकारने येत्या वर्षासाठी सबसिडी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु ती […]Read More

देश विदेश

१८ हजार गाईंचा होरपळून मृत्यू

टेक्सास, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेत डेअरी उत्पादनाला कृषी क्षेत्रात महत्त्वाचं स्थान आहे. मात्र एका दुर्देवी घटनेमुळे येथील पशुपालन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.अमेरिकेत पश्चिम टेक्सासमध्ये एका डेअरी फार्ममध्ये झालेल्या स्फोटामुळे जवळपास १८ हजार गायींचा मृत्यू झाला आहे. टेक्सासच्या डिमिटमध्ये साऊथ फोर्क डेअरी फार्ममध्ये मोठा स्फोट झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. या […]Read More

महानगर

नवी मुंबईत जड अवजड वाहनांना प्रवेश बंद

ठाणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनामार्फत रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ एप्रिल ते १६ एप्रिल या काळात नवी मुंबईतील वाहतूकीत बदल करण्यात आले असून सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना या काळात प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविली आहे. नवी मुंबईतील खारघर […]Read More

महानगर

चैत्यभूमी इथे मान्यवरांचे अभिवादन

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. यानिमित्ताने डॉ. आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे आज सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मान्यवरांनी अभिवादन केले.Greetings to dignitaries here at Chaityabhoomi राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, दिपक केसरकर, आमदार आशीष शेलार, खासदार […]Read More

महानगर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चेंबूरमध्ये अशोक स्तंभाचे लोकार्पण

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारताच्या सार्वभौमत्वाचे राष्ट्रीय प्रतीक असलेला अशोक स्तंभ सुमारे १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर उभारण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने, गुरुवारी रात्री 11 वाजता या अशोक स्तंभाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामजिक न्याय ( […]Read More

महानगर

मिरवणूकीत वीजेच्या झटक्यानं २ जणांचा मृत्यू, तर ४ गंभीर

पालघर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातल्या विरार भागातील कारगिल नगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकी दरम्यान वीजेचा झटका लागल्यानं 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विरारच्या कारगिल नगर मधल्या बौध्दजन पंचायत समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त […]Read More