१८ हजार गाईंचा होरपळून मृत्यू

 १८ हजार गाईंचा होरपळून मृत्यू

टेक्सास, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेत डेअरी उत्पादनाला कृषी क्षेत्रात महत्त्वाचं स्थान आहे. मात्र एका दुर्देवी घटनेमुळे येथील पशुपालन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
अमेरिकेत पश्चिम टेक्सासमध्ये एका डेअरी फार्ममध्ये झालेल्या स्फोटामुळे जवळपास १८ हजार गायींचा मृत्यू झाला आहे. टेक्सासच्या डिमिटमध्ये साऊथ फोर्क डेअरी फार्ममध्ये मोठा स्फोट झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत १८ हजार गायी होरपळून मृत पावल्या.

हा स्फोट इतका भयंकर होता की जवळपास तासभर डेअरी फार्मवर आगीच्या ज्वाळा आणि काळाकुट्ट धूर पसरला होत्या. दरम्यान, या स्फोटामागेच कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इंडिया टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. स्फोट होताच आग लागली. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांत आगीच्या ज्वाळा पसरल्या. आसमंत धुराच्या लोटांनी व्यापला. कॅस्ट्रो काऊंटी शेरीफ कार्यालयानं घटनेचे फोटो शेअर केले आहेत. त्यातून दुर्घटनेची तीव्रता दिसून येत आहे.

या दुर्घटनेत मनुष्यहानी झालेली नाही. मात्र तब्बल १८ हजार गायींचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहोचले. त्यांनी एका व्यक्तीला वाचवलं. तो दुर्घटनेत जखमी झाला होता. त्याला इमारतीमधून बाहेर काढण्यात आलं. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

SL/KA/SL

14 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *