मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.Voting on December 18 for […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये गुंतवणूकविषयक सामंजस्य करार करण्यात येणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी आपल्या शिष्टमंडळासह आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.Memorandum of Understanding between West Midlands and Maharashtra in Britain या भेटीत त्यांनी परस्पर सहकार्याने दोन राज्यातील […]Read More
मुंबई,दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या २० आशियायी महिला उद्योजकांच्या यादीत स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (सेल) सोमा मंडल, एमक्युअर फार्माच्या व्यवस्थापकीय संचालक नमिता थापर आणि होनासा कंझ्युमरच्या सहसंस्थापक गजल अलघ यांचा समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सच्या नोव्हेंबर महिन्याच्या ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.कोरोनाच्या अनिश्चिततेच्या काळात व्यवसाय वृद्धी आणि विस्तार करणाऱ्या महिला […]Read More
मुंबई, दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फरार भारतीय हिरे व्यापारी नीरव मोदीला भारताकडे सोपवण्यास आज लंडन उच्च न्यायालयाने मंजुरी दिली. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी नीरव मोदी भारतातून फरार झाला होता. त्याने तब्बल १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय तपास यंत्रणांकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्याचा तपास होणार आहे. नीरव मोदीला […]Read More
अलिबाग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यातील रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या निषेधार्थ कोलाड नाका येथे रायगड प्रेस क्लबतर्फे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. रायगड प्रेस क्लबने अनेक वेळा मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, शासनाकडे पत्रव्यवहार आदी मार्गाने या रस्त्याच्या प्रश्नासाठी आंदोलन केलेले आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज सकाळी मुंबई – गोवा महामार्गावरील कोलाड […]Read More
नवी दिल्ली, दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज न्या. धनंजय चंद्रचूड यांना सरन्यायाधिशपदाची शपथ दिली. ते आता भारताच्या ५० व्या सरन्यायाधिशपदी विराजमान झाले आहेत.राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. पुढची दोन वर्षे ते या पदावर राहणार आहेत. न्या. चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर याच विद्यापीठातून […]Read More
पुणे, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान अनिवार्य असतं भारतात युवा वर्गाचा सर्वाधिक टक्का असून त्यांना या प्रक्रियेत सामावून घेण्याच्या दृष्टीने विद्यापीठ स्तरातून मतदार नोंदणी जागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे अशी माहिती भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पुण्यात दिली.Special voter awareness for youth participation मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यात शंभर दिवसानंतर खासदार संजय राऊत यांना 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.आज संध्याकाळ- पर्यंत राऊत बाहेर येण्याची शक्यता आहे. या जामिनाविरुद्ध ईडी हायकोर्टात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक […]Read More
नांदेड, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत आहेत त्याला काँग्रेस महत्व देत नाही. पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस प्रचंड आहे. ही यात्रा ‘मन की बात’ ची यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया […]Read More
नवी दिल्ली,९ नोव्हेंबर : काल रात्री १.५७ वाजता भारत, चीन आणि नेपाळमध्ये (India Nepal Earthquake) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ पर्यंत मोजली गेली. भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नेपाळला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. […]Read More