संजय राऊत यांना जामीन,आजच सुटका

 संजय राऊत यांना जामीन,आजच सुटका

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यात शंभर दिवसानंतर खासदार संजय राऊत यांना 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.आज संध्याकाळ- पर्यंत राऊत बाहेर येण्याची शक्यता आहे. या जामिनाविरुद्ध ईडी हायकोर्टात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला.

3 सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या वकीला मार्फत पीएम एलए न्यायालयात जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. जामिनावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला. आज संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.

अखेर 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणामध्ये प्रविण राऊत आणि संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे. संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. आज संध्याकाळपर्यंत राऊत जेल मधून बाहेर येण्याची शक्यता आहे.Raut granted bail after 100 days दरम्यान संजय राऊत यांच्या जामिनावर ईडी हायकोर्टात जाणार आहे. ईडीने स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

विशेष कोर्टाने पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत आणि प्रविण राऊत या दोघांनाही जामीन मंजूर केला. त्यामुळे ईडीला मोठा धक्का बसला होता. ईडीनं या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणी कोर्टाकडं केली होती. मात्र, कोर्टाने ही ईडीची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने दिलेल्या जामीनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.
या याचिकेवर उद्या उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

ML/KA/PGB
9 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *