युवकांच्या सहभागासाठी विशेष मतदार जागृती

 युवकांच्या सहभागासाठी विशेष मतदार जागृती

पुणे, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान अनिवार्य असतं भारतात युवा वर्गाचा सर्वाधिक टक्का असून त्यांना या प्रक्रियेत सामावून घेण्याच्या दृष्टीने विद्यापीठ स्तरातून मतदार नोंदणी जागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे अशी माहिती भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पुण्यात दिली.Special voter awareness for youth participation

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या अनुषंगाने विंविध कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ आज पुण्यात होत आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात मल्टी मीडिया प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या हस्ते सकाळी पार पडले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

देशात 2 लाख 49 हजार नागरिक शंभरच्या वर आहेत तर 1.9 क्कोटी नागरिक 80 वर्षाच्या पुढे आहेत. अशा विविध वयोगटातील नागरिक मतदान करतात. हीच वैविध्य ता लोकतंत्र विकासाचे प्रतीक असून यांची अपेक्षा मतपेटीतून व्यक्त होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मतदानापासून कोणीही वंचित न राहणे, मतदानाचा अधिकार बजावणे आणि प्रलोभनाला बळी न पडणे या त्रीसूत्री आधारावर लोकशाही मजबूत होत असून युवा वर्ग याचा पाय असल्याचे निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तत्पूर्वी केंद्रीय संचार ब्युरो यांच्या वतीने लोककलांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोंधळ, वासुदेव वारी,लावणी आणि जोगवा या माध्यमातून मतदार नोंदणीचा जागर करण्यात आला.

या कार्यक्रमानंतर निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी तृतीयपंथीय वर्गाशी संवाद साधत त्यांचे हक्क आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात संमवून घेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. पांडे यांनी बोलताना सांगितले की अमेरिकेतील महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी शंभर वर्षांहून अधिकचा काळ लागला परंतू भारतातील महिला मतदानाचा अधिकार पहिल्या निवडणुकी पासून मिळाला आहे.. .

ML/KA/PGB
9 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *