Month: November 2025

महानगर

सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्या…

ठाणे, ता. २५ नोव्हेंबर २०२५ मुंबईच्या वेशीवरील ठाणे शहराची ओळख नजीकच्या काळात वाहतुक कोंडीचे शहर म्हणून होऊ लागल्याने ही चिंतेची बाब आहे. या कोंडीला रस्त्यांची दुरावस्था व अन्य बाबी कारणीभुत असल्या तरी, ठाणे शहरातील वाहनांची वाढती संख्यादेखील वाहतुक कोंडीचे कारण ठरत आहेत. साधारणतः १८ लाख लोकसंख्येच्या ठाण्यात आजघडीला तब्बल साडेसोळा लाख वाहने आहेत. त्यामुळे नागरिकांनी […]Read More

महानगर

संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांचे स्मारकाच्या जागेची निवड करा  –

मुंबई, दि २५: हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील मौजे पराड येथे स्मारक उभारणी करावयाची असून याकामी जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने पुढील 7-8 दिवसांत जागा निवडीचा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे पराड येथे संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

संविधान गौरव दिन पुरस्कार सन्मान सोहळा,

पुणे, दि २५: महाराजा अग्रेसन फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने संविधान गौरव दिन पुरस्कार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य कार्यक्रम बुधवार, दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बॉपोडी, पुणे येथे पार पडणार आहे. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संविधान गौरव दिन पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

टाऊनशीपमधील घरांच्या खरेदीदारांना सावधगिरीचा इशारा

पुणे, दि. २५फॉरेस्ट ट्रेल्स टाऊनशिप, भूगाव, पुणे या प्रकल्पाचे प्रवर्तक (पी.पी.) असलेल्या परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शन लिमिटेडने, प्रकल्प विकसित करताना अनेक अनियमितता आणि बेकायदेशीरपणा करून कायद्याचे उल्लघन केले आहे. पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी रहिवाश्यांच्या तक्रारींची दाखल घेऊन केलेल्या चौकशीमधून फॉरेस्ट ट्रेल्स टाउनशिपमध्ये झालेली बेकायदेशीर कामे आणि फसवणूक उघडकीला आली आहे. त्यापैकी अनेक बेकायदेशीर गोष्टी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

‘सिद्धी साधनेचा’ महाआशीर्वाद

पुणे, दि २५: सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रह्मर्षी गुरुदेव हे तब्बल 68 दिवसांच्या महासाधने नंतर आपले दिव्य आशीर्वाद देण्यासाठी प्रथम पुण्यात येत आहेत. त्यांच्या सिद्धी साधनेच्या महाआशीर्वादाचा लाभ पुणेकरांना मिळावा यासाठी विश्व धर्म चेतना मंच,पुणे, पीसीएमसी परिवार यांच्या वतीने ‘सिद्धी साधनेचा महाआशीर्वाद’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा येत्या 29 नोव्हेंबर रोजी शनिवारी सायंकाळी […]Read More

महानगर

कॉटनग्रीन रेल्वे स्थानक लवकरच स्कायवॉकला जोडणार

मुंबई, दि २५कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाला स्कायवाकला जोडण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरु केले आहे.परंतु मागील काही महिन्यांपासून तेथील काम बंद असल्यामुळे भायखळा, काळाचौकी, फेरबंदर, अभ्युदय नगर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. स्थानकावर चढताना नागरिकांना वडाळा दिशेकडून चढून पुन्हा मागे यावे लागत होते. त्यामुळे बराचसा वेळ हा लागत होता. त्यामुळे नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात […]Read More

शिक्षण

2026 मध्ये कोणत्या डिग्रीजना असेल सर्वाधिक मागणी? MBA खरंच मागे

मुंबई दि २५ : आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात, बारावीनंतर कोणती पदवी निवडावी या गोंधळात अनेक विद्यार्थी अडकले आहेत. “सुरक्षित” करिअरबद्दलच्या पारंपरिक कल्पनांना आता आव्हान मिळत आहे आणि पूर्वी महत्त्वाच्या वाटणाऱ्या अनेक पदव्या आज तितक्या प्रभावी राहिलेल्या नाहीत. तुमच्या मनातील हीच भीती आणि गोंधळ दूर करण्यासाठी, ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट 2026’ हा एक महत्त्वाचा मार्गदर्शक ठरतो. हा […]Read More

महानगर

विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरीता भांडुप मध्ये अभ्यासिका

मुंबई, दि. २५ – भांडुप परिसरात मुलांच्या अभ्यासाकरीता वाचनालय तसेच अभ्यासिका पाहिजे म्हणुन गेली अनेक वर्षे पालक आणि विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात होती. या मागणीला अनुसरुन ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या खासदार निधीतून भांडुप पश्चिम येथे भव्य अशी वास्तु उभी करण्यात आली असून स्थानिक विद्यार्थ्यांना या वास्तुचा उपयोग अभ्यासाकरीता करता येणार आहे. कामगार […]Read More

महानगर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘स्वच्छ वायूसाठी

मुंबई 25बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने, ‘स्वच्छ वायूसाठी युवकांची सक्रियता’ (उज्ज्वल भविष्यासाठी हरित जीवन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबूर येथील विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथे दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजता या वेळेत हा कार्यक्रम पार पडेल. पर्यावरण व वातावरणीय बदलाच्या […]Read More

राजकीय

महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत १५ दिवसांनी वाढवा.

मुंबई, दि. २५ : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहिर झाली असून या याद्यांवर हरकती व सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी मुदत वाढविण्याची आवश्यकता असून अवघी ७ दिवसांची मुदत अत्यंत कमी आहे, ती १५ दिवसांनी वाढवून […]Read More