Month: November 2025

कोकण

सात एकरांतील पिकाचं नुकसान, शेतकऱ्याच्या पदरी विम्याचे अडीच रुपये

पालघर, दि. ३ : लांबलेल्या पावसामुळे कापणीसाठी तयार झालेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून मदत मिळण्याचे काम संथावलेले आहे तर पिकविमा काढलेल्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू आहे. वाडा तालुक्यात परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतात साचलेल्या पाण्यामुळे भाताला पुन्हा कोंब फुटून हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. […]Read More

ट्रेण्डिंग

ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द

मुंबई, दि. 3 : राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे विधिज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने आज हा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात बार कौन्सिलमध्ये अपील करणार असल्याचे सरोदे यांनी स्पष्ट केले. गेल्या २५ वर्षांपासून अन्यायग्रस्त लोकांना मी मदत […]Read More

राजकीय

एसटीच्या मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प, ३०० मेगॅवॅट वीजनिर्मितीचे लक्ष

मुंबई दि ३: एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर तसेच कार्यशाळेच्या व बसस्थानकांच्या छतावर ‘ सौरऊर्जा प्रकल्प ‘ उभारुन त्याद्वारे वर्षाला सुमारे ३०० मेगावॉट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून त्याद्वारे वर्षाला सुमारे १ हजार कोटी रुपये किंमतीची वीजनिर्मिती करण्याचा महत्वकांक्षी ‘ सौर ऊर्जा हब ‘ उभारुन एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री […]Read More

क्रीडा

३६ वी किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा बुधवारपासून बोपखेलमध्ये-

पुणे, दि, ३: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने होणारी ३६वी किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ५ नोव्हेंबरपासून श्रीरंग भाऊ धोदाडे क्रीडानगरी, बोपखेल गावठाण येथे सुरू होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची गटवारी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.दरम्यान […]Read More

राजकीय

अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात द्या: राजेश

मुंबई, दि, ३ अंधेरी येथील अद्ययावत सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे ही मुंबईकरांची मागणी आहे. हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांना देण्याचा घाट घातला जात आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत या हॉस्पिटलचे खाजगीकरण करू नये. भाजपा महायुती सरकारने मुंबईकरांच्या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, यासाठी ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसमोर तीव्र आंदोलन करणार, असा […]Read More

शिक्षण

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ.

पुणे, दि ३: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), विश्वराजबाग, पुणे या विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. यंदाचा समारंभ राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली, स्वामी विवेकानंद […]Read More

महानगर

आरे, वाकोला व विक्रोळी येथील उड्डाणपुलांवरील रस्त्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुनर्पृष्ठीकरण

मुंबई, दि ३पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (MSRDC) यांच्या मालकीच्या आरे, वाकोला आणि विक्रोळी येथील उड्डाणपुलांवरील रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण (Resurfacing) करावे. संपूर्ण महामार्गावर वाहतूक सुरळीत रहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे. वर्दळीच्या वेळी अवजड वाहनांचे अवागमन बंद ठेवावे, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय वाणिज्य व […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

वेंसर हॉस्पिटलचा गुडघा प्रत्यारोपण रुग्णांसाठी अभिनव उपक्रम

पुणे, दि ३: ऑर्थोपेडिक्स आणि नेत्ररोग या क्षेत्रात विशेष सेवा देणारे बहुविशिष्ट वेंसर हॉस्पिटल यांनी गुडघा प्रत्यारोपण रुग्णांसाठी अभिनव पुनर्वसन उपक्रम सुरू केला आहे. “48 तासांत पहिले पाऊल” या नावाने ओळखला जाणारा हा कार्यक्रम रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर केवळ दोन दिवसांत सुरक्षितपणे उभे राहणे, चालणे आणि आत्मविश्वासाने घरी परतणे शक्य करतो. हा उपक्रम वेंसर हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागाच्या […]Read More

कोकण

वादळातील दोन बोटीवरील खलाशांना वाचवणारा युवक ठरला देवदूत….

अलिबाग दि ३ : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजापाडा येथील अतिश सदानंद कोळी आणि त्याच्या साथीदाराने आपल्या जीवाची बाजी लावून वादळात अडकलेल्या दोन बोटीवरील १५ खलाशांना सुखरूप करंजा येथे आणून त्यांचा जीव वाचवला असल्याने तो त्या १५ खलाशांसाठी देवदूत ठरला आहे. नुकताच निर्माण झालेल्या चक्रीवादळाने रायगड मधील मच्छीमारी साठी गेलेल्या अनेक मच्छीमारी बोटींचा संपर्क तुटला […]Read More

क्रीडा

अजितदादांची विजयी घोडदौड, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावर चौथ्यांदा मोहोर

मुंबई, दि २ : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) अध्यक्षपदी सलग ४ वेळा पुन्हा एकदा सर्वसंमतीने निवड झाली आहे. अजित दादांच्या या विजयामुळे राजकारणासोबतच त्यांची क्रीडा क्षेत्रावर सुद्धा भक्कम पकड असल्याचं अधोरेखित झालं आहे. एकूण ३१ क्रीडा संघटनांपैकी तब्बल २२ पेक्षा जास्त संघटनांनी अजित पवार यांच्या […]Read More