Month: November 2025

राजकीय

उत्पन्न वाढीसाठी एसटी करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री

मुंबई दि ४: उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने एसटी महामंडळ राज्यभरात स्वतः च्या जागेवर २५० पेक्षा जास्त ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल बरोबर च CNG व इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट असलेले रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात […]Read More

क्रीडा

विश्र्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचे मंत्रिमंडळाने केले अभिनंदन

विश्र्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचे मंत्रिमंडळाने केले अभिनंदन मुंबई, दि. ४: – आयसीसी महिला विश्र्वचषकावर पहिल्यांदाच भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. याबाबतच्या अभिनंदन प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संघाच्या या […]Read More

विदर्भ

रस्त्यावर झाला शंखी गोगल गायींचा सुळसुळाट…

वाशीम दि ४ : वाशीमच्या कारंजा शहरातील हासमानी नगर परिसरात मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगायी दिसून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लहान आणि मोठ्या आकाराच्या या गोगल गायी रस्त्यावर फिरताना आढळल्या. अवकाळी पावसामुळे ओलसर वातावरण तयार झाल्याने या निशाचर गोगल गायी जमिनीबाहेर आल्याचे दिसते.या गोगलगायी रात्री सक्रिय राहतात आणि शेतातील कोवळी पिके, […]Read More

महानगर

सांडपाणी शुद्धीकरण आणि पुनर्वापराचे सर्वंकष धोरण जाहीर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने सांडपाणी शुद्धीकरण आणि पुनर्वापरासाठी एक व्यापक धोरण जाहीर केले आहे. या धोरणामुळे लवकरच गृहनिर्माण संस्था, औद्योगिक वसाहती आणि इतर नागरी भागांमध्ये बागकाम, फ्लशिंग, वाहन धुणे आणि अग्निशमन यांसारख्या कामांसाठी शुद्ध केलेल्या सांडपाण्याचा वापर अनिवार्य होणार आहे. गोड्या पाण्याचा वापर मर्यादित करून पर्यायी स्रोत उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट […]Read More

मनोरंजन

सुप्रसिद्ध लेखक क्षितीज पटवर्धनचे दिग्दर्शनात पदार्पण

मुंबई, दि. 3 : फास्टर फेणे, डबलसीट, बालक-पालक, सिंघम अगेन अशा विविध चित्रपटांचे लेखक क्षितिज पटवर्धन आता दिग्दर्शन म्हणून पदर्पण करत आहे. उत्तर हा आई मुलाच्या नात्यांची आजच्या परिभाषेतील गोष्ट सांगणारा त्यांचा चित्रपट १२ नोव्हेंबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री रेणूका शहाणे यात आईची भूमिका करणार आहेत तर अभिनय बेर्डे मुलाची भूमिका करणार आहे. […]Read More

मनोरंजन

शाह बानो प्रकरणावर आधारित चित्रपट अडकला वादात

मुंबई, दि. ३ : यामी गौतम आणि इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘हक’ हा चित्रपट वादात सापडला आहे. हा चित्रपट शाह बानो प्रकरणावर आधारित आहे, ज्याने १९७० च्या दशकात मुस्लिम महिलांच्या हक्कांची मागणी करून राष्ट्रीय चर्चेला सुरुवात केली होती. शाह बानोच्या मुलीने आता इंदूर उच्च न्यायालयात चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली आहे […]Read More

ट्रेण्डिंग

कार्ड नसतानाही ATM मधून काढू शकाल पैसा

मुंबई, दि. ३ : ATM मधून पैसे काढण्यासाठी आता एटीएम कार्डची आवश्यकता नाही. देशभरातील बँकांनी UPI कार्डलेस कॅश विथड्रॉवल फीचर सुरू केले आहे. हे तुम्हाला Google Pay, PhonePe किंवा BHIM अॅपवरून थेट पैसे काढण्याची परवानगी देते. हे फीचर केवळ जलद आणि सोपे नाही तर अत्यंत सुरक्षित देखील आहे. कारण ते कार्ड स्वाइप करण्याची किंवा पिन […]Read More

पर्यावरण

बिबट्याच्या दहशतीमुळे महामार्ग ठप्प

नाशिक, दि. ३ : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची मालिका थांबत नाहीये. गेल्या 5 वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जांभूत आणि पिंपरखेड ही गावे बिबट्याच्या हल्ल्याचे केंद्र बनली असून, केवळ एका महिन्यात पिंपरखेडमध्ये 3 मृत्यू झाले आहेत. 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बळी गेल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट पुणे-नाशिक […]Read More

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

मुंबई, दि. ३ : ‘खाष्ट सासू’ तसेच खलनायकी व्यक्तिरेखांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री दया डोंगरे (८५) यांचे आज निधन झाले. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने रुपेरी पडद्यावर आणि रंगभूमीवर एक वेगळी छाप सोडली होती. दया डोंगरे यांच्या गाजलेल्या कामांमध्ये ‘चार दिवस सासूचे’ (मालिका), ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘उंबरठा’, ‘मायबाप’, ‘कुलदीपक’ […]Read More

देश विदेश

मदरशातून १५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त

भोपाळ, दि. ३ : मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील एका मदरशातून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचे महाराष्ट्रातील मालेगावशी कनेक्शन असल्याची माहितीही समोर येत आहे. खांडवा जिल्ह्यातील जवार पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात असलेल्या या मदरशातून आतापर्यंत १५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी […]Read More