Month: November 2025

ट्रेण्डिंग

HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

मुंबई, दि. २९ : वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ ‎‎(HSRP) बसवण्यासाठी उद्या अखेरची मुदत आहे. हाय सेक्युरिटी नंबर प्लेट‎बसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यासाठी ३१ मार्च २०२५‎ही मुदत दिली होती. मात्र, त्याला वाहनधारकांचा अल्प ‎‎प्रतिसाद असल्याने ३ वेळा मुदतवाढ दिली आहे.‎ ‎त्यानंतरही नंबर प्लेट बदलणे ‎बाकी असलेल्या वाहनांची संख्या ‎मोठी आहे. या सर्व वाहनांवर ‎कारवाई करणे शक्य […]Read More

राजकीय

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक १ डिसेंबर ऐवजी ३ डिसेंबर

मुंबई दि २८ : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ८ डिसेंबर पासून चालू होत आहे हे अधिवेशन . स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती काळ चालवायचे तसेच या अधिवेशनात येणारी विधेयके व कामकाजाचा क्रम ठरवण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक १ डिसेंबर ऐवजी ३ डिसेंबर रोजी १२ वाजता विधान भवनात आयोजित केल्याचे विधानमंडळाचे […]Read More

देश विदेश

आरक्षण मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्द, सर्वोच्च न्यायालयाची तंबी

नवी दिल्ली, दि. २८ : राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण दिल्याबाबत दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा गंभीर असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात यावे, असा निर्णय दिला आहे. पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी होणार असून, तेव्हा या प्रकरणाची सविस्तर तपासणी […]Read More

राजकीय

निवडणुकांसाठी आता 1 डिसेंबर रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुदत

मुंबई, दि. २८: नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असेल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी […]Read More

महानगर

महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाज सुधारक

मुंबई, दि २८महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजामध्ये शिक्षण प्रसारकाच काम केलं असून त्यांच्यामुळेच अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या असे जाहीर प्रतिपादन काँग्रेसचे माजी आमदार मधू अण्णा चव्हाण यांनी त्यांच्या भायखळा येथील जनसंपर्क कार्यालयात पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना केले.ते पुढे म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या. सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या

पुणे, दि २८:-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन व समता भूमी येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महात्मा फुले वाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.काँग्रेस भवन येथील कार्यक्रमात बोलताना अरविंद शिंदे […]Read More

महानगर

*फोर लेबर कोडचे भूत आता कायमची अध्यापार करावे लागेलसचिन आहीर

मुंबई, दि २८शंभर वर्षांपूर्वीच्या लढ्यातून मिळविलेले २९ कामगार कायदे निर्दयीपणे पायदळी तुडवून,राक्षसी आणि हुकुमशाही पध्दतीने चार कामगार संहिता सर्व राज्यांना लागू करणा-या भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पुन्हा सर्व कामगार संघटनांना रस्त्यावर उतरावे लागेत,अशा कठोर शब्दांत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी नवीन कामगार संहितेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे. […]Read More

राजकीय

कोण आहेत राज्याचे नवे मुख्य सचिव राजेश अग्रवाल? जाणून घ्या

“मॅथ्स”वर जीव जडलेले; अल्गोरिदमबद्दल आकर्षण असलेले, तंत्रज्ञ मनोवृत्तीचे आयआयटीयन; 1993 ते 1996 मध्ये होते जळगावात CEO विक्रांत पाटील महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव झालेले राजेश अग्रवाल हे महाराष्ट्र केडरच्या 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे पंजाबमधील जालंधर येथील आहेत आणि त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1966 रोजी झाला. शिक्षण आयआयटी, दिल्ली मधून संगणक विज्ञानात बी.टेक […]Read More

महानगर

काळाचौकी येथील मालवणी जत्रेला उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि २८शिवसेना शाखा क्रमांक 205 चे नगरसेवक दत्ता पोंगडे आणि शाखाप्रमुख जयसिंग भोसले यांच्यावतीने काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदान येथे मालवणी जत्रा उत्सवाचे आयोजन केले होते. त्यास विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या जत्रोत्सवात विविध खाद्यसंस्कृती, पारंपारिक लोककला, सुस्वर भजन,मनोरंजन इत्यादी कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी झुंबड पहायला मिळाली. लहान मुलांसाठी या ठिकाणी विविध प्रकारचे पाळणे,ट्रेन , […]Read More

महानगर

दादर येथील जीव देवशी निवासमध्ये स्लॅब कोसळला, मोठी दुर्घटना टळली

मुंबई, दि २८–एल आय सी मालकीच्या 90 वर्षांहून अधिक जुन्या दादर येथील जीव देवशी निवास इमारतीत स्लॅब कोसळून दोन महिलांना दुखापत झाली. 19 वर्षांच्या तरुणीच्या खांद्याला मार लागला. मोठी दुर्घटना टळली असली तरी ही घटना इमारतीची धोकादायक अवस्था आणि एलआयसीच्या दीर्घकाळ चाललेल्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेण्यासारखी आहे.म्हाडाने या इमारतीला C1 – राहण्यास अत्यंत असुरक्षित असे […]Read More