Month: November 2025

राजकीय

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशन आता ऑफलाईनसुद्धा

मुंबई, दि. १४ : नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी शनिवारी (ता. 15) आणि रविवारी (ता. 16) देखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता […]Read More

देश विदेश

संशोधित वीज वितरण क्षेत्र योजनेसाठी महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी!

नवी दिल्ली दि १४ :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांची नवी दिल्ली येथे भेट घेत पायाभूत सुविधांच्या संशोधित वीज वितरण क्षेत्र योजनेसाठी (आरडीएसएस) महाराष्ट्राला 2655 कोटी रुपये देण्याची मागणी केली. लवकरच हा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सोबतच 8000 मेगावॅट तास क्षमतेच्या बॅटरी स्टोरेज प्रकल्पासाठी व्यवहार्यता तूट निधी देण्यासाठी सुद्धा सकारात्मक […]Read More

राजकीय

येत्या पाच वर्षांत बिहार वेगाने प्रगती करेल – पंतप्रधान मोदींचा

नवी दिल्ली, दि. १४ : बिहारमध्ये NDA ला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ६:५१ वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले. त्यांनी मफलर फिरवत कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनीही मफलर दाखवले. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्वप्रथम सांगितले की, लोकांनी जंगल राजविरुद्ध विकास निवडला. या विजयावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहारच्या लोकांनी खळबळ […]Read More

राजकीय

बिहारमध्ये भाजपला मोठे यश, पुन्हा येणार NDA सरकार

पाटना, दि. १४ : आज जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप आणि एनडीए आघाडीने प्रचंड यश मिळवले असून बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी एनडीए आघाडीने तब्बल २०० हून अधिक जागा जिंकून “डबल सेंच्युरी” मारली**. या निकालामुळे बिहारमध्ये […]Read More

ट्रेण्डिंग

हा मराठी नेता आहे बिहार विजयाचा शिल्पकार

पाटना, दि. १४ : बिहारमध्ये आज NDA मिळाल्या प्रचंड यशामागे एका मराठी नेत्याचे कष्ट कारणीभूत ठरले आहेत. बिहार विधानसभा निवडणूकीत (Bihar Election Result) NDA ने एकतर्फी बाजी मारली आहे. एनडीएने 200 हून अधिक जागा मिळवल्या असून तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या महागठबंधनला फक्त 36 जागा मिळाल्या आहेत. पण या विजयाचा खरा शिल्पकार एक मराठी चेहरा […]Read More

महानगर

बोरीवली राष्ट्रीय उद्यानात धावणार ओपन विंटेज टॉय ट्रेन

मुंबई, दि. 14 : मुंबईच्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दुसरी वन राणी विंटेज टॉय ट्रेन दाखल झाली आहे. येथील उद्यानात पहिली व्हिस्टाडोम टॉय ट्रेन सुरू असतानाच आता दुसरी विंटेज ओपन टॉय ट्रेन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये दाखल झाल्याने पर्यटकांसाठी ही गुडन्यूज आहे. वनराणी नावाने लोकप्रिय असलेल्या या ट्रेनची चाचणी धाव सुरू असून 2 ते […]Read More

राजकीय

गायिका मैथिली ठाकूर ११ हजार मताधिक्यांने विजयी

पाटना, दि. १४ : बिहारमधील प्रसिद्ध गायिका मैथली ठाकुरने आपली राजकीय कारकीर्द दणक्यात सुरु केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्याच्या अलीनगर विधानसभेतून मैथिलीने विजय मिळवत अवघ्या 25 व्या वर्षी विधानसभेत एन्ट्री केली आहे. तिने राजद उमेदवार विनोद मिश्रा यांचा 11 हजार मतांनी पराभव केला आहे. पहिल्याच प्रयत्नात आमदारकी पटकावली आहे. विजयी आघाडी घेताच तिने […]Read More

देश विदेश

पाकीस्तानात घटनादुरुस्ती विरोधात लष्कर प्रमुख आणि न्यायाधीश आमनेसमाने

इस्लामाबाद, दि. १४ : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने बंड केले आहे. मन्सूर अली शाह आणि अतहर मिनाल्लाह या दोन वरिष्ठ न्यायाधीशांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामा पत्रांमध्ये, न्यायाधीशांनी म्हटले आहे की मुनीर यांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देणे आणि त्यांना संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्त करणे हे संविधानाचे उल्लंघन आहे. त्यांनी २७ व्या घटनादुरुस्तीला […]Read More

मनोरंजन

8 नवे चित्रपट आणि सीरिज OTT वर दाखल

मुंबई, दि. १४ : या विकेंडला ओटीटी प्लॅटफॉर्मवर कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन, सस्पेन्स, थ्रिलरसह अनेक मजेदार चित्रपट आणि सीरिज रिलीज झाल्या आहेत. त्यामुळे शनिवार रविवार तुम्ही घरबसल्या मनोरंजनाचा मोठा आनंद घेऊ शकता. जॉली एलएलबी 3 (Jolly LLB 3) : ‘जॉली एलएलबी 3’ हा कॉमेडी कोर्टरूम ड्रामा असणारा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. […]Read More

मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन

मुंबई, दि. १४ : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचे आज वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. १९४०-५० च्या दशकातील त्या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. साधेपणा आणि प्रभावी अभिनय यामुळे त्यांनी चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यांना श्रावण, विदूर, राहुल अशी तीन मुले आहेत. कामिनी कौशल यांनी शहीद (Shaheed,), नदीया के पार, शबनम, आरजू […]Read More