Month: April 2025

ट्रेण्डिंग

ग्रॅच्युटी देण्यास विलंब केल्यास दहा टक्के व्याज देणे बंधनकारक

मुंबई उच्च न्यायालयाने आज कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यानंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युईटीच्या हक्काबाबत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिला आहे. कोणतीही संस्था अथवा कंपनी कर्मचाऱ्याच्या ग्रॅच्युईटीची रक्कम एका महिन्यापेक्षा अधिक काळ रोखू शकत नाही. जर एका महिन्यापेक्षा अधिक विलंब केला गेला तर संबंधित संस्था वा कंपनीने कर्मचाऱ्याला ग्रॅच्युईटीच्या रकमेवर वार्षिक दहा टक्के व्याज देणे बंधनकारक राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय […]Read More

ट्रेण्डिंग

Paytm Gold ची फक्त ९ रुपयांत सोन्यात गुंतवणूक करण्याची ऑफर

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोने महागले असले तरीही अक्षय्य तृतीया या साडेतीन मुहूर्तावर थोडे तरी सोनो खरेदी करावे अशी लोकांची इच्छा असते. यासाठी Paytm (वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड) ने ‘गोल्डन रश’ नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश लोकांना डिजिटल पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे आहे. तुम्ही पेटीएम गोल्डमध्ये […]Read More

विदर्भ

शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड, अमरावती विमानतळाचा विस्तार

मुंबई, दि. २५ – – आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड व 8 वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिली. अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची 91 वी बैठक सह्याद्री अतिथीगृहातील […]Read More

ट्रेण्डिंग

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर

मुंबई दि २५–महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील […]Read More

राजकीय

सावरकरांवरील वक्तव्य , राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

प्रतिनिधीनवी दिल्ली, 25 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधाणावर तीव्र नाराजी व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना ताकिद दिली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावरकर यांनी आयुष्य पणाला लावले हे आपण विसरता कामा नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लखनौ न्यायालयाने बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी याचिका […]Read More

पर्यटन

तापमानाच्या उच्चांकमुळे ताडोबा दुपार सफारीच्या वेळेत बदल

चंद्रपूर दि २५:– चंद्रपुरात तापमानाच्या उच्चांकामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दुपार सफारीच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. दुपारची सफारी २:३० ते ६:३० वाजता ऐवजी आता दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजता अशी करण्यात आली आहे. हा बदल १ मेपासून करण्यात येणार होता. पुढील आदेशापर्यंत नव्या वेळेनुसारच सफारी होणार आहे. सकाळच्या सफारीत कोणताही बदल झालेला नाही. […]Read More

Uncategorized

विधानपरिषदेच्या समित्यांचे प्रमुख आणि समिती सदस्यांच्या झाल्या नियुक्त्या…

मुंबई दि. २४ — महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सन 2024-2025 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची तसेच समिती प्रमुखांची नियुक्ती केली आहे. समिती पध्दतीला संसदीय लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नि:सत्र कालावधीत समिती कामकाजाच्या माध्यमातून कायदेमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रणाचे कार्य सुरु असते. भारतीय राज्यघटनेतील सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन (Check and Balance) हे तत्व समितीपध्दतीमुळे अधिक […]Read More

राजकीय

महाराष्ट्रातील 500 पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

मुंबई दि २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली होती, त्यातून 184 पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका […]Read More

पर्यटन

शाश्वत पर्यटन – निसर्गाचं रक्षण करताना प्रवासाचाही आनंद

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):सुट्टी म्हणजे पर्यटन आणि पर्यटन म्हणजे निसर्गाचा सानिध्यात वेळ घालवणं – पण आता यामध्ये एक नवी जागरूकता आली आहे, ती म्हणजे ‘शाश्वत पर्यटन’. यामध्ये पर्यावरणाचा कमीत कमी नाश करत प्रवास करणं, स्थानिक संस्कृतीचा आदर राखणं आणि स्वच्छता टिकवणं यावर भर असतो. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पर्यटकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, स्थानिक मालाचा वापर […]Read More

पर्यटन

अंजनेरी – नाशिकजवळील हनुमान जन्मभूमीचा रहस्यपूर्ण डोंगर

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):नाशिकपासून सुमारे २० किमी अंतरावर अंजनेरी नावाचा डोंगर आहे, जो श्री हनुमानाची जन्मभूमी मानला जातो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा डोंगर गिर्यारोहक आणि धार्मिक प्रवाशांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. अंजनेरी डोंगरावर पोहोचण्यासाठी सुमारे दोन तासांचा ट्रेक लागतो. उंचीवरून दिसणारा नाशिकचा नजारा आणि निसर्गाचं सौंदर्य मन मोहवून टाकतं. येथे हनुमानाची गुहा आणि अंजनी […]Read More