Month: January 2025

महानगर

राज्यातील लोककलाकारांचे सर्व्हेक्षण करण्याची सांस्कृतिक कार्यमंत्र्यांकडे मागणी.

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासन दरबारी कुठे नोंद नसलेल्या राज्यातील दुर्लक्षित आणि उपेक्षित लोककलाकारांचे सर्व्हेक्षण व्हावे अशी मागणी लोककला क्षेत्रातील तज्ञांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे. सध्या महाराष्ट्रात अंदाजे पंधरा हजार कलावंत आपल्या कलेच्या उपजिविकेवर जगत आहेत मात्र शासन दरबारी त्याची कुठेच नोंद नाही. तमाशा -लावणी,भारूड दशावतार, कीर्तन, खडीगंमत,शाहिरी, झाडीपट्टी, […]Read More

महानगर

वर्सोवा- विरार दरम्यान होणार सी- लिंक रोड

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्सोवा ते विरार हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकार एक मास्टर प्लॅन तयार करत आहे.यामुळे दोन ते तीन तासांचे हे प्रवासाचे अंतर पाऊणतासात पार करता येणार आहे. एमएमआरडीएने उत्तन ते विरारपर्यंतचा 55 किमीवर लिंक रोड बनवण्यासाठी प्लान तयार केला आहे. त्यामध्ये 24 किमी लांबीचा सी-लिंक असेल. हा प्रोजेक्ट […]Read More

राजकीय

झीनत’ वाघिणीमुळे दोन राज्यांमध्ये राजकीय ताण

भुवनेश्वर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये सध्या झीनत या वाघिणीवरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. गेल्या आठवड्यात झारखंड वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पश्चिम बंगालपासून अंदाजे २० किलोमीटर अंतरावर एक वाघीण आढळली होती. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या वाघीणीला भटकी वाघीण म्हटले होते. तसेच या वाघीणीला पकडण्यासाठी ओडिशा […]Read More

कोकण

दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील दापोली तालुक्यातील हर्णें जवळील समुद्रातील सुवर्णदुर्ग हा शिवकालीन किल्ला आजही दिमाखात उभा आहे. राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचालींना वेग आला आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था (युनेस्कोने) या जलदुर्गाची पाहणी केली […]Read More

महिला

महिला क्रिकेट: विदर्भाने हिमाचलचा आठ गडी राखून पराभव

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कटक येथे सुरू असलेल्या महिलांच्या 23 वर्षांखालील टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी विदर्भासोबत झालेल्या सामन्यात हिमाचलला पराभवाचा सामना करावा लागला. विदर्भाने हिमाचलचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हिमाचलने 17 षटकांत 65 धावा केल्या. कर्णधार सोनल एस ठाकूरने 19 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 18 धावा केल्या. मनीषाने […]Read More

ऍग्रो

बारदाना नसल्याने हमीभाव केंद्रावरील सोयाबीनच्या खरेदीला ब्रेक…

जालना दि ९:– बारदाना उपलब्ध नसल्याने जालन्यात हमीभाव केंद्रावरील सोयाबीनच्या खरेदीला ब्रेक लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतमाल विक्री होण्यासाठी अडचण येत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. बारदाना उपलब्ध नसल्याने हमीभाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी गेल्या 2/3 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलेच वैतागलेले आहेत. 8 दिवसांवर संक्रांत सण येऊन ठेपलाय, पण बारदाना […]Read More

देश विदेश

लॉस एंजेलिसमध्ये जंगलात भीषण आग, ३ लाख लोकांचे स्थानांतर

लॉस एंजेलिस, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हॉलिवूडसाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेली आग शहरापर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत 4 हजार 856 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आगीत सुमारे 1100 इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या असून 28 हजार घरांचे नुकसान झाले आहे. आता जंगलात पसरलेल्या आगीमुळे 5 जणांचा […]Read More

पर्यटन

वंदे भारत एक्स्प्रेसचा चित्रपटांच्या शुटींगसाठी वापर करण्यास मंजुरी

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाडीचा चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी वापर करू देण्यास पश्चिम रेल्वे प्रशासनाने पहिल्यांदाच मंजुरी दिल्याने लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीनंतर काल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर प्रसिद्ध दिग्दर्शक शुजित सरकार यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात वंदे भारत एक्स्प्रेस गाडीचा वापर […]Read More

महानगर

आपले सरकार सेवा पोर्टल’द्वारे दिल्या जाणार्‍या सेवांमध्ये वाढ …

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेत राज्य सेवा हक्क आयोगाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकार्‍यांना महत्त्वाचे निर्देश दिले. राज्यातील नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘आपले सरकार सेवा पोर्टल’द्वारे सद्यस्थितीत ५३६ ऑनलाईन सेवा दिल्या जात आहेत, त्याचा नागरिकांना […]Read More

महानगर

जीएसटीच्या जाचातून छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य करदात्यांची सुटका करा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कर दशहतवादाचा सामना लघू , छोटे, मध्यम व्यापारी यांना करावा लागत आहे. जीएसटी स्लॅबची रचना अत्यंत किचकट असल्याने व्यापाऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तसेच देशातील नोकरदार, मध्यमवर्ग तसेच सर्वसामान्य जनतेकडून सर्वात जास्त जीएसटी कर संकलन होत असून मुठभर श्रीमंतांवर मात्र कर सवलतींचा वर्षाव […]Read More