Month: November 2024

देश विदेश

Competition Commission of India कडून Meta ला २१३.१४ कोटींचा दंड

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्हॉट्सॲपने नव्याने स्वीकारलेल्या गोपनीयता धोरणाच्या संदर्भात अनुचित व्यावसायिक प्रथांचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत, भारतीय स्पर्धा आयोगाने (Competition Commission of India) काल व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या मेटाला २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. Competition Commission of India ने मेटाला बाजार वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल २१३.१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला, असे आदेशात […]Read More

देश विदेश

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिली अण्वस्त्र वापरास परवानगी

मॉस्को, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बने केलेल्या विध्वंसानंतरही जगभरातील देशांनी अण्वस्त्र बनवणे थांबवलेले नाही. भारतासह जगातिक बहुसंख्य विकसनशील आणि विकसित देशांनी स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्रांची निर्मिती सुरुच ठेवली आहे. मात्र अद्याप त्याच्या वापरास कोणी धजावलेले नाही. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अण्वस्त्र वापराच्या निर्णयाला परवानगी […]Read More

पर्यटन

गंगास्नान धोकादायक, हरित लवादाने दिला इशारा

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कृषी परंपरेचा अविभाज्य भाग असलेली गंगा नदी आता अतिरेकी मानवी हस्तक्षेपामुळे धोकादायक पातळीपर्यंत प्रदुषित झाली आहे. त्यामुळे अतिशय पवित्र मानले गेलेले गंगास्नानही आता धोकादायक झाले आहे. राष्ट्रीय हरित लवादानेच हा धोक्याचा इशारा दिला असून गंगेच्या काठावर सर्वसामान्य लोकांसाठी धोक्याचा इशारा देणारे फलक […]Read More

देश विदेश

भारताचं नवं सॅटेलाईट लॉंच, इलॉन मस्क यांच्या SpaceX चे सहाय्य

भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT-N2 अवकाशात झेपावले आहे. ISRO चे हे सॅटेलाईट (उपग्रहाच्या) उद्योगपती इलॉन मस्कच्या SpaceX यांच्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. याचे कार्य सुरू झाल्यानंतर भारताची दळणवळण व्यवस्था अधिक बळकट होईल, असे सांगितले जात आहे. 4700 किलोग्रॅम वजनाच्या GSAT-N2 […]Read More

राजकीय

विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पैसे वाटप , विरोधकांची कारवाईची मागणी

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघात भाजपा कडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार समोर आला असून नालासोपारा पूर्वेकडील विवांता हॉटेल येथे पैसे वाटले जात होते अशी तक्रार असून त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे देखील उपस्थित होते, त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली असून निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई […]Read More

राजकीय

सुधीरभाऊंसाठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

चंद्रपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना हिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू लागले असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. त्याचेच प्रत्यंतर म्हणून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातल्या कोसंबी गावात सोमवारी रात्री काँग्रेसच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांबरोबर राडा करत थेट महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला करण्याचा […]Read More

महिला

महिला उद्योजिका दिन : स्त्री ठरवेल, तेच तिचे स्थान असेल

-राधिका अघोर आपण अनेक कुटुंबातून ऐकलं असेल, विशेषतः नवऱ्यांच्या तोंडून की आमचं अर्थखाते सगळं गृहमंत्रालयाकडे असते. म्हणजे घराच्या चाव्या गृहलक्ष्मी च्या हातात असतात. यातला गमतीचा भाग सोडला तरी हिशेब आणि खर्चाचे व्यवस्थापन घरातल्या महिलाच नीट करू शकतात. एकाचवेळी वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याची अष्टावधानी क्षमता त्यांच्यात असते. एखाद्या यशस्वी उद्योजकाला आवश्यक अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यात […]Read More

महानगर

मेट्रोच्या खोदकामामुळे गिरगावातील मंदिराला गेले तडे

मुंबई. दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुलाबा-सीप्झ मेट्रोच्या खोदकामामुळे गिरगावच्या काळाराम मंदिराला तडेमुंबई – कुलाबा-सीप्झ या मुंबईतील पहिल्या पूर्ण भूमिगत मेट्रो रेल्वे मार्गासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे गिरगावातील सुमारे दोनशे वर्षे जुन्या काळाराम मंदिराच्या कमानीला तडे गेले आहेत. ही कमान कोसळू नये म्हणून लोखंडी रॉडचे टेकू देण्यात आले आहेत.या मंदिरातील मूर्ती काळ्या पाषाणापासून बनलेल्या आहेत. […]Read More

महिला

श्रीलंकेमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी महिला विराजमान

श्री जयवर्धनेपुरा कोट्टे,दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंकेत 14 नोव्हेंबरला संसदीय निवडणुका झाल्या. यामध्ये राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांची आघाडी एनपीपीने विजय मिळवला होता. सोमवारी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या आहेत. अमरसूर्या या श्रीलंकेत पंतप्रधानपद भूषवणाऱ्या तिसऱ्या महिला आहेत. त्यांच्या आधी सिरिमाओ भंडारनायके (3 वेळा) आणि चंद्रिका कुमारतुंगा […]Read More

पर्यावरण

प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व शाळा बंद ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळी पोहोचली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. तसेच ग्रॅप-३ आणि ग्रॅप-४ चे नियम लागू करण्यासाठी तीन दिवस उशीर केल्यावरून न्यायालयाने दिल्ली सरकारला चांगलेच फटकारले.दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर पोहोचली आहे. अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता ४०० एक्यूआयच्याही […]Read More