तूर आणि हरभरा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव, औषध फवारणी सुरू…
जालना, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात अनेक ठिकाणी गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या दाट धुक्यांमुळे हरभरा, तूर यासह इतर पिकावर अळी आणि बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्याकडून पिकांवर आता औषध फवारणीला सुरुवात झाली आहे. बुरशीजन्य रोगांमुळे ऐन फुलोऱ्यात आलेली तूर आणि हरभरा ही पिके हातातून जाऊ नये यासाठी शेतकरी महागडे औषध फवारताना दिसताहेत.
दरम्यान पिकांवर पडत असलेल्या रोगांसंदर्भात कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. ऐन फुलोऱ्यात आलेली पिके हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते आहे .