सीताफळाचे दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात
वाशिम दि २८:– वाशीम जिल्ह्यातील सीताफळ उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सीताफळाचे बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून फळबागा निवडल्या आहेत. रिसोड तालुक्यातील बाळखेड परिसरात मोठ्या प्रमाणावर सीताफळाच्या बागा फुलल्या आहेत. मागील 7-8 वर्षांपासून या सीताफळांमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र, यावर्षी स्थानिक बाजारपेठांमध्ये मागणी नसल्याने सीताफळे अत्यल्प दरात विकावी लागत आहेत.