Month: April 2024

मराठवाडा

अवकाळी पावसाचे थैमान, वीज पडून 4 जनावरे दगावली…

जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्यातल्या भोकरदन – जाफ्राबाद तालुक्याला अवकाळी पावसाने पुन्हा झोडपून काढलंय. 5 दिवसांच्या विश्रांती नंतर भोकरदन जाफ्राबाद तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची जनावरे दगावलीय. यात 2 गाई, 1 बैल आणि एका मशीचा समावेश असून वीज पडून या 4 जनावरांचा दुर्दैवी […]Read More

देश विदेश

दुबईत महापूर, एकाच दिवसात पडला दोन वर्षांचा पाऊस

दुबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तापमान वाढीमुळे जगाच्या विविध भागांत टोकाचे हवामान बदल दिसून येत आहेत. थंड हवामान प्रदेशात प्रचंड उष्णता तर उष्ण प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी अनुभवास येत आहे. वाळवंटात वसलेल्या दुबईमध्ये सध्या प्रचंड महापूर आला असून रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत आहेत. एरवी दुबईत दोन वर्षांत पडणारा पाऊस काल एकाच दिवसात झाला […]Read More

पर्यावरण

ई-वाहन चार्जिंगसाठी Tata Power ने उभारले १० कोटी किलोमीटरचे जाळे

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येता काळ हा ई-वाहनांचा असणार आहे. भारतीय ग्राहक दुचाकी आणि चार चाकी E-VEHICLES ना मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत आहेत. ऑटोमोबाईल कंपन्याही वाहन निर्मितीमध्ये अद्ययावत सुधारणा करत नवनवीन मॉडेल्स डेव्हलप करत आहेत. यामुळे वायू आणि ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण मिळवता येणार आहे. याचा साकल्याने विचार करून सन २०३०पर्यंत देशातील सार्वजनिक […]Read More

मराठवाडा

छ. संभाजी नगरमध्ये चारा छावणी सुरू

छ. संभाजी नगर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० शीचा काटा पार केला आहे. राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठाही झपाट्याने खालावत आहे. राज्यातील मराठवाडा विभागात पाणीप्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे.जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने शेतीचा पाणीपुरवठा कमी करण्यात आला आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे […]Read More

मनोरंजन

अमिताभ बच्चन यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नुकताच यंदाचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्यासह मराठी काही कलाकारांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराची घोषणा पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत काल करण्यात आली. यावेळी ‘लता मंगेशकर पुरस्कार’ आणि महाराष्ट्राचा मानाचा पुरस्कार […]Read More

पर्यावरण

ट्रेकर्समध्ये लोकप्रिय, सावंदुर्गा

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समुद्रसपाटीपासून सुमारे 4025 फूट उंचीवर असलेले, बंगलोरजवळचे हे हिल स्टेशन जगातील सर्वात मोठ्या मोनोलिथ्सपैकी एक मानले जाते. हे ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे कारण ते त्यांना एक लहान, परंतु रोमांचक सहलीची संधी देते; रात्रीच्या ट्रेकिंगचाही पर्याय आहे. भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: सप्टेंबर ते फेब्रुवारीयासाठी प्रसिद्ध: सावंडी वीरभद्रेश्वर स्वामी आणि नरस्मिहा […]Read More

ट्रेण्डिंग

उद्या ओपन होणार Vodafone Idea चा FPO

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Vodafone Idea (VI) या दूरसंचार कंपनीचा FPO उद्यापासून ओपन होणार आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या कंपनीला याद्वारे 18 हजार कोटी रुपये उभे करायचे आहेत. FPO म्हणजेच फॉलो ऑन पब्लिक ऑफर ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे स्टॉक एक्स्चेंजवर आधीच सूचीबद्ध असलेली कंपनी गुंतवणूकदारांना किंवा विद्यमान भागधारकांना, सामान्यतः प्रवर्तकांना […]Read More

राजकीय

महिला आरक्षणाचे प्रमाण विधानसभा व लोकसभा उमेदवारीसाठी लागू करा

मुंबई दि.17(एम एमसी न्यूज नेटवर्क) : महिला आरक्षणाचा मुद्दा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून चर्चेत आहे. सर्वांत आधी स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला आरक्षण मिळालं. त्यानंतर, आता हा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेपर्यंत पोहोचला आहे. या लढ्याचे व्यापक स्वरुप म्हणजे राजकीय क्षेत्रात सुद्धा स्थानीक स्वराज्य संस्था मध्ये ५०%आरक्षण मिळाले हि बाब स्वागतार्ह असून महिलांच्या सन्मानाची ही खरी […]Read More

खान्देश

काळाराम मंदिरात रामनवमी साजरी

नाशिक, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रामनवमी निमित्त नाशिक येथील जगप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिरात तसेच नाशिक शहरातील इतर मंदिरामध्ये रामनवमी उत्साहात संपन्न झाली. नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये दुपारी बारा वाजता राम जन्म उत्सव झाला , यावेळी विशेष महाआरती करण्यात आली. नाशिक येथे राज्याचे मंत्री दीपक केसरकर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्यासह काही […]Read More

साहित्य

‘साहित्य भारती’ अध्यक्षपदी पद्मश्री नामदेव कांबळे यांची निवड.

वाशीम, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत ‘साहित्य भारती’ची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सोमवारी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी वाशीम येथील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार पद्मश्री नामदेव कांबळे यांची निवड झाली आहे. त्यानुषंगाने अखिल भारतीय साहित्य परिषद वाशीमच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय साहित्य […]Read More