दुबईत महापूर, एकाच दिवसात पडला दोन वर्षांचा पाऊस

 दुबईत महापूर, एकाच दिवसात पडला दोन वर्षांचा पाऊस

दुबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तापमान वाढीमुळे जगाच्या विविध भागांत टोकाचे हवामान बदल दिसून येत आहेत. थंड हवामान प्रदेशात प्रचंड उष्णता तर उष्ण प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी अनुभवास येत आहे. वाळवंटात वसलेल्या दुबईमध्ये सध्या प्रचंड महापूर आला असून रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत आहेत. एरवी दुबईत दोन वर्षांत पडणारा पाऊस काल एकाच दिवसात झाला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या २४ तासांत १६० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षांमध्ये मिळून या भागात इतका पाऊस होतो.

धुळीच्या वादळांनी आणि उष्णतेच्या झळांचा अनुभव घेणाऱ्या दुबईकरांसाठी या एवढ्या प्रचंड पावसाचा अनुभव थक्क करणारा आहे. १६ एप्रिल रोजी या ‘डेजर्ट सिटी’मध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर हा पाऊस थांबण्याचं नावच घेत नव्हता. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट चालू होता. दुबईवासियांना अशा वातावरणाची बिलकूल सवय नाही. मुसळधार पावसामुळे काही तासांत दुबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली.

दुबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, अनेक मेट्रो स्थानकं, मॉल्स, रस्ते, व्यावसायिक इमारतींमध्ये पाणी शिरलं आहे. मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, दुबईत ठिकठिकाणी पाणी साचलं असून त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. अनेकजण ‘ही मुंबई नसून दुबई’ आहे, अशा शब्दांत या पूराचं वर्णन करत आहेत.

SL/ML/SL

17 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *