हा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ!

 हा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ!

पुणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थ होईन असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, माजी आमदार ऍड. राम कांडगे, दिलीप ढमढेरे, शिवसेना उपनेते बबनराव थोरात, माजी आमदार बाळासाहेब दांगट, आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हल्ली माझ्यावर फार राग दाखवत आहे. मोदी यांनी एकेकाळी भाषण केले होते की, मी शरद पवार यांच्या बोटाला धरुन राजकारणात आलो. मात्र, आता तेच मोदी बोलत आहेत की, महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे, ती अस्वस्थ आहे. हे खरं आहे माझा आत्मा अस्वस्थ आहे. परंतु, तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर जनता भोगत असलेल्या दु:खासाठी अस्वस्थ आहे असे पवार म्हणाले.

तो अस्वस्थ आत्मा मागील ४५ वर्षे राज्याचे राजकारण अस्थिर करत आहे. तो राज्यातील सरकार अडचणीत आणतो. हे खरं आहे माझा आत्मा अस्वस्थ आहे. परंतु, तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर जनता भोगत असलेल्या दु:खासाठी अस्वस्थ आहे. देशातील शेतकऱ्यांची दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल, तर त्यामध्ये काही चुकीचे वाटत नाही. सध्या संपूर्ण देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना दररोजचा संसार चालवणे अवघड झाले आहे. या गोष्टीसाठी मी १०० वेळा अस्वस्थ होईन असेही पवार यांनी सांगितले.

सर्व सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्याने काम केले पाहिजे, हे यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत. या संस्कारांशी मी कधीच कोणतीही तडजोड करणार नाही. असे पवार यांनी मोदींना ठणकावून सांगितले. मी तडफड करत आहे. होय, मी देशातील लोकांचं दु:ख पाहून खूप तडफडतो. त्यासाठी मला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मी लाचार होणार नाही. महाराष्ट्र देखील दिल्लीपुढे लाचार होणार नाही असे पवार म्हणाले.

ML/ML/PGB 30 APR 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *