Month: January 2024

महानगर

26 जानेवारीला अजेय संस्थेचा तंत्रोत्सव

ठाणे , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्यक्रमाची विविधता देणाऱ्या अजेय संस्थेचा 26 जानेवारी 2024 रोजी तंत्राला अनोखी मानवंदना देण्यासाठी तंत्रोत्सव हा कार्यक्रम विष्णुनगर, ठाणेमध्ये असलेल्या विद्यालंकार सभागृह, डॉ बेडेकर विद्यामंदिर इथे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. पूर्ण दिवस चालणारा आणि एकाच विषयाच्या अनेक बाजू मांडणारा […]Read More

अर्थ

विशेष सत्र असलेल्या ऐतिहासिक आठवड्यात भारतीय बाजारात (Stock Market) मोठी

मुंबई, दि. 21 (जितेश सावंत) :२० जानेवारी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजारात मोठी घसरण झालेली पाहावयास मिळाली सेन्सेक्स आणि निफ्टी 1% पेक्षा जास्त गडगडले. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला बँक निफ्टीत 3%ची घसरण दिसली. यूएस फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर क्रिस्टोफर वॉलर यांच्या कमेंट मुळे मार्च दर कपातीची कमी झालेली अपेक्षा,एचडीएफसी बँकेचे अपेक्षेपेक्षा कमी आलेले तिमाही निकाल तसेच त्यामुळे […]Read More

गॅलरी

अयोध्या कार्यक्रमासाठी विठ्ठल मंदिराला विद्युत रोषणाईचा साज..

सोलापूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आयोध्या येथील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. मंदिरावर असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शिखरासह संपूर्ण मंदिर महाद्वार, नामदेव पायरी, गोपूर आणि तुकाराम भवन या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे रूप सध्या खुलून दिसत आहे. विशेष म्हणजे […]Read More

सांस्कृतिक

35 हजार प्रज्वलित पणत्यांनी झाली रामनाम अक्षरे साकार…

चंद्रपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चंद्रपुरात 35 हजार प्रज्वलित पणत्यांनी रामनाम अक्षरे साकार करण्याचा विश्वविक्रम केला गेला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय समितीच्या वतीने चांदा क्लब मैदानावर यासाठीचा प्रयत्न केला गेला. गिनीज बुक रेकॉर्ड समितीच्या पथकाने यासाठी सर्व निकषांची तपासणी केली. शहरातील रामभक्त आणि नागरिकांना हा विश्वविक्रम अचूकतेने […]Read More

पर्यावरण

उद्यानासाठी ‘चिपको’ आंदोलन

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने घाटकोपर येथील एका भूखंडावर मियावाकी वनाची स्थापना केली. या उद्यानात 10 हजारांहून अधिक झाडे लावण्यात आली. मात्र, आता या ठिकाणी रुग्णालय आणि स्मशानभूमीचा विस्तार करण्याची सूचना पालिका करत आहे. समाजातील सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि उद्यानाचे जतन करण्यासाठी ‘चिपको’ चळवळ सुरू केली. मुंबईत […]Read More

करिअर

राजस्थान उच्च न्यायालयात कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पदांसाठी रिक्त जागा

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थान उच्च न्यायालयात कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पदांसाठी रिक्त जागा शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.संगणकाचे ज्ञान.वय श्रेणी : 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान. शुल्क: सामान्य: 750 रुOBC, EBC आणि EWS: 600 रुSC, ST, PWBD आणि ESM: 450 रुनिवड प्रक्रिया: हिंदी लघुलेखन चाचणीसंगणक चाचणीदस्तऐवज पडताळणीवैद्यकीय तपासणी.पगार: 33 हजार रुपयांवरून 1 […]Read More

देश विदेश

नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आदित्य यांनी आपल्या चुलत भावाचा जीव वाचवण्यासाठी आपला प्राण गमावला. आदित्य यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आदित्य आणि त्यांचा चुलत भाऊ नदीच्या किनाऱ्याजवळ खेळत होते. खेळताना […]Read More

देश विदेश

भारत-म्यानमार सीमा अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्राचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील काही दिवसांपासून भारत आणि म्यानमार यांच्यातील सीमावाद उफाळला होता. सीमारेषावर तणावाचं वातावरण होतं. म्यानमारमधून घुसखोरी केली जात असल्याचे अनेकदा समोर आले होते. त्यामुळे केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मोठी घोषणा केली. म्यानमार (Myanmar Border) सिमा अधिक सुरक्षीत करण्याचा निर्णय […]Read More

सांस्कृतिक

या थिएटरमध्ये Live पाहता येणार श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

मुंबई,दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येत होऊ घातलेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या अभूतपूर्व अशा दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सगळेच रामभक्त उत्सुक आहेत. परंतु प्रत्येकालाच इथे उपस्थित राहणं शक्य होणार नाही.सध्या जगभरातील श्रीरामभक्त केवळ 22 जानेवारी 2024 या दिवसाची वाट पाहत आहेत. या दिवशी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहता […]Read More

बिझनेस

कंपनीच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमातच सीईओचा अपघाती मृत्यू

हैदराबाद, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Vistex Asia या कंपनीच्या रौप्य महोत्सवी वर्षांच्या सेलिब्रेशनचा कार्यक्रम सुरु असताना झालेल्या अपघातात कंपनीचे सीईओ संजय शाह यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. याला कारणीभूत ठरला आहे तो सेलिब्रेशनचा आधुनिक हटके प्रकार. हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये मनाला चटका लावणारी ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विसटेक्स कंपनीचा सिल्व्हर ज्युबिली […]Read More