विशेष सत्र असलेल्या ऐतिहासिक आठवड्यात भारतीय बाजारात (Stock Market) मोठी घसरण
मुंबई, दि. 21 (जितेश सावंत) :२० जानेवारी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजारात मोठी घसरण झालेली पाहावयास मिळाली सेन्सेक्स आणि निफ्टी 1% पेक्षा जास्त गडगडले. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला बँक निफ्टीत 3%ची घसरण दिसली.
यूएस फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर क्रिस्टोफर वॉलर यांच्या कमेंट मुळे मार्च दर कपातीची कमी झालेली अपेक्षा,एचडीएफसी बँकेचे अपेक्षेपेक्षा कमी आलेले तिमाही निकाल तसेच त्यामुळे बँकिंग शेअर्समध्ये झालेली घसरण,बाजाराचे महाग झालेले वॅल्युएशन, तसेच विदेशी बाजारातून मिळालेले नकारात्मक संकेत, इराण आणि पाकिस्तानमधील तणाव या सगळ्याचा एकत्रित परिणाम बाजारावर होताना दिसला आठवड्याच्या उत्तरार्धात काहीशी रिकव्हरी दिसली परंतू वरच्या स्तरावर नफावसुली देखील झाली.
येणाऱ्या आठवड्यात सुट्या असल्याने कामकाजासाठी छोट्या असलेल्या या आठवड्यात BoJ आणि ECB चे व्याजदर निर्णय,US GDP डेटा,जास्तीत जास्त जाहीर होणारे तिमाही निकाल व प्री बजेट सेंटीमेंट या सगळ्याच्या प्रभाव बाजारावर होताना दिसेल.
Technical view on nifty-.
शनिवारी निफ्टीने 21571.8
चा बंद भाव दिला. तांत्रिकदृष्ट्या बाजारात कमकुवत पणा जाणवत आहे निफ्टी साठी 21547
- 21517-21500 हे महत्वाचे सपोर्ट स्तर आहेत हे तोडल्यास निफ्टी 21477-21448-
21434 -21365-
21329-21285 हे स्तर गाठेल. हे स्तर तोडल्यास घसरण वाढेल.गुंतवणूकदारानी घसरणीचा लाभ घ्यावा आणि चांगल्या समभागात गुंतवणूक करावी.वरच्या स्तरावर निफ्टी साठी 21650-21688-
21720-21755-21834 हे रेसिस्टन्स ठरतील.
सेन्सेक्स, निफ्टी नवीन उच्चांकावर बंद
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजाराने नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचा सिलसिला सुरूच ठेवला.संमिश्र जागतिक संकेत असूनही, निर्देशांकांनी सकारात्मक सुरुवात केली आणि 73,402.16 आणि 22,115.55 असे विक्रमी उच्चांक गाठले.सेन्सेक्सने प्रथमच 73,000 अंकांची पातळी ओलांडली. माहिती तंत्रज्ञान, तेल, वायू आणि बँकिंग खरेदीमुळे बाजाराचा उत्साह वाढला.सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही त्यांच्या सार्वकालिक उच्चांकावर बंद झाले. सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाले.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 759.49 अंकांनी वधारून 73,327.94 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 203.00 अकांची वाढ होऊन निफ्टीने 22,097.50 चा बंद दिला. Sensex, Nifty close at new highs
पाच दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला.
सलग पाच दिवस सुरु असलेल्या तेजीला मंगळवारी ब्रेक लागला.कमकुवत आशियाई बाजारांमुळे,भारतीय निर्देशांक नकारात्मक नोटवर उघडले. दुपारनंतर झालेल्या माहिती तंत्रज्ञान,फार्मा, रियल्टी आणि पॉवर समभागांमधील विक्रीने, मोठ्या चढउताराच्या दिवशी अखेर बाजार घसरणीसह बंद झाला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 199.17 अंकांनी घसरून 73,128.77 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 65.20 अंकांची घट होऊन निफ्टीने 22,032.30 चा बंद दिला. Market snaps 5-day winning run
सेन्सेक्सची 19 महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली.
बुधवारचा दिवस मार्केटसाठी अत्यंत घातक ठरला.बाजारात कोहराम माजला मोठ्या प्रमाणात घसरण झाली आणि 19 महिन्यातील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली. दिवसभरात सेन्सेक्स 1700 अंकांनी गडगडला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 1,628.01अंकांनी घसरून 71,500.76 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 460.30 अंकांची घट होऊन निफ्टीने 21,572 चा बंद दिला. Sensex, Nifty sees their worst single-day fall in 19 months.
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण
जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण पाहावयास मिळाली.
सुरवातीच्या तासात बाजारातील घसरण वाढत गेली परंतु दुपारच्या सुमारास बाजारात झपाट्याने रिकव्हरी झाली तथापि पुन्हा दबाव आल्याने बाजार रिकव्हरी राखण्यात अयशस्वी ठरला , पुन्हा एकदा घसरला परंतू दिवसाच्या नीचांकी पातळीपासून वर बंद होण्यात यशस्वी ठरला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 313.90 अंकांनी घसरून 71,186.86 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 109.70 अंकांची घट होऊन निफ्टीने 21,462.30 चा बंद दिला. The equity benchmarks ended lower for the third straight day.
तीन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी
सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतांनी बाजाराला चांगला पाठिंबा दिलायामुळे आज देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मजबूत वाढीसह बंद झाले.एफएमसीजी, आयटी आणि ऊर्जा समभागातील खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील खरेदीमुळेही बाजारात उत्साह वाढला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 496.37 अंकांनी वधारून 71,683.23 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 160.10 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 21,622.40 चा बंद दिला. The benchmarks indices broke their three-day losing streak.
सेन्सेक्स 260 अंकांनी घसरला
जागतिक बाजारातील मजबूत संकेतांच्या पार्श्वभूमीवर शनिवारच्या विशेष सत्रात बाजाराची सुरुवात बँका आणि वाहन समभागातील खरेदीमुळे मजबूत झाली. परंतु अचानक जाहीर झालेल्या या विशेष सत्रात गुंतवणूकदार तितकासा तयार नसल्याने वरच्या स्तरावर नफावसुली झाली आणि बाजार घसरणीसह बंद झाला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 260 अंकांनी घसरून 71,425 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 37 अंकांची घट होऊन निफ्टीने 21,586 चा बंद दिला. Sensex falls 260 pts
( लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ आहेत )
ML/KA/PGB
21 Jan 2024