Month: December 2023

विदर्भ

महानुभाव पंथातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.पुरुषोत्तम नागपुरे यांचे निधन

अमरावती दि.१२ : (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वयाची ब्याण्णवी पार केल्यानंतरही व्रतस्थपणे लेखन, वाचन करणारे महानुभाव पंथाचे ज्येष्ठ साहित्यिक आणि संत प्रा.पुरुषोत्तम नागपुरे उपाख्य ईश्री कारंजेकर दादा यांचे आज सकाळी अमरावती येथे निधन झाले. उद्या १३ डिसेंबर रोजी त्यांची अंतेष्टी अमरावती येथील गांधीनगर निवासस्थानावरुन केल्‍या जाणार आहे. प्रा.पुरुषोत्तम नागपुरे यांच्या निधनाने एका संवेदनशील लेखकाला महानुभाव […]Read More

विदर्भ

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लोगोचे अनावरण

नागपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्याची सरकारची भूमीका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातल्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही […]Read More

बिझनेस

कायनेटिक ग्रीनने लाँच केली झुलू ई-स्कूटर

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या तरुणाईला आकर्षक डिझाईन्स असणाऱ्या पर्यावरणपुरक इ-बाइक्सनी भुरळ घातली आहे. तरुणाईची ही क्रेझ लक्षात घेऊन कंपन्या नवनवीन इ- बाइक्स लाँच करत आहेत. कायनेटिक ग्रीन, भारतातील एक अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने मुंबईतील एका कार्यक्रमात आपली अत्यंत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, ZULU लाँच केली. याचबरोबर कायनेटिक ग्रीनने आज “प्लॅनेट एट […]Read More

बिझनेस

कोटक महिंद्रा बँकेने वाढवले एफडीचे दर

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई : वर्ष अखेर जवळ आल्यामुळे ग्राहकांना खूश करण्यासाठी बँका ठेवीवर विशेष योजना जाहीर करत आहेत. नुकतेच BoIने आपल्या FD दरात सुधारणा जाहीर केली होती. त्यानंतर आता कोटक महिंद्रा बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. कोटक बँकेने 3 वर्षे आणि त्यावरील परंतु 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात […]Read More

ट्रेण्डिंग

पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी शाहरुख, अक्षय,अजयला न्यायालयाची नोटीस

अलाहाबाद, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पान मसाल्याची जाहिरात केल्याबद्दल शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना सोशल मिडियावर सातत्याने ट्रोल करण्यात येत आहेत. आता या तीन लोकप्रिय अभिनेत्यांना ही जाहिरात केल्या प्रकरणी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना पान मसाल्याच्या जाहिरातीबद्दल नोटीस बजावली आहे. या तिघांविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ […]Read More

राजकीय

छत्तीसगड आणि म. प्र. मुख्यमंत्री पदासाठी मिळाले नवे कोरे चेहरे

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपने छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी नवीन चेहऱ्यांची नियुक्ती करुन मतदारांना आणि मुख्यमंत्रीपदाच्या परंपरागत दावेदारांना धक्का दिली आहे. मोहन यादव यांची मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तर विष्णुदेव साय यांची छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आज भाजपने जाहीर केले. मोहन यादव उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार […]Read More

देश विदेश

जम्मू-काश्मीरमधून ३७० हटवण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची मोहर

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीरमधुन संविधानातील अनुच्छेद 370 हटवण्याचा केेद्र सरकारचा निर्णय योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस संजय किशन कौल, जस्टिस संजीव खन्ना, जस्टिस बीआर गवई आणि जस्टिस सूर्यकांत यांच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्याचबरोबर कोर्टाने जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर निवडणुका […]Read More

महिला

राष्ट्रीय महिला आयोगाकडून महिला कैद्यांच्या स्थितीची तपासणी

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात महिला कैद्यांची काय स्थिती आहे, त्यांच्यासोबत कसा व्यवहार केला जातो, हे तपासण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या जॉईंट सेक्रेटरी ए. अशोली चलाई यांनी अचानक नागपूर कारागृहात भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. या भेटीत चलाई यांनी महिला कैद्यांची स्थितीही जाणून घेतली. राज्यात मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणाने प्रचंड खळबळ […]Read More

करिअर

मार्केटिंग क्षेत्रात करिअर करण्याचीही संधी वाढली

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजघडीला पारंपरिक व्यापाराबरोबरच ऑनलाइन नेटवरील म्हणजेच डिजिटल मार्केटिंगचा वापर वेगाने वाढत चालला आहे. तंत्रज्ञानाचा बदलता आविष्कार आणि डिजिटल उत्पादने वापरण्याची पद्धत यानुसारही डिजिटल ॲडर्व्हर्टायझिंगचे रंगरूप पालटते आहे. पूर्वी वेबसाइट असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते, आता ती एक आवश्यक; परंतु, रोजच्या दिसण्यातली बाब झाली आहे. याउलट सोशल नेटवर्किंग साइटस्वर […]Read More

Lifestyle

फिटनेससाठी हा एक लाडू बनवा

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हे लाडू एकंदर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतात. हे लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये पोषक तत्वांचा खजिना दडलेला आहे. Eat this 1 ladle in the morning with milk हे उर्जेने भरलेले लाडू बनवण्यासाठी बदाम, खजूर, फ्लेक्स बिया, खरबूज आणि भोपळ्याच्या बिया देखील वापरल्या जातात. या सर्व गोष्टी शरीरासाठी खूप […]Read More