मार्केटिंग क्षेत्रात करिअर करण्याचीही संधी वाढली

 मार्केटिंग क्षेत्रात करिअर करण्याचीही संधी वाढली

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजघडीला पारंपरिक व्यापाराबरोबरच ऑनलाइन नेटवरील म्हणजेच डिजिटल मार्केटिंगचा वापर वेगाने वाढत चालला आहे. तंत्रज्ञानाचा बदलता आविष्कार आणि डिजिटल उत्पादने वापरण्याची पद्धत यानुसारही डिजिटल ॲडर्व्हर्टायझिंगचे रंगरूप पालटते आहे. पूर्वी वेबसाइट असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते, आता ती एक आवश्यक; परंतु, रोजच्या दिसण्यातली बाब झाली आहे. याउलट सोशल नेटवर्किंग साइटस्वर कंपनीचे पान असणे ही सध्याची ‘इन थिंग’ आहे.

एकंदरीने पाहता डिजिटल माध्यमांनी मार्केटिंग आणि जाहिरातीचे एक अतिविशाल व अनोखे दालन उघडले आहे यात वादच नाही. माहितीच्या विस्फोटामुळे ग्राहकवर्गही अधिक जागरूक झाला आहे आणि स्वत:च्या गरजांनुसार असलेले उत्पादन शोधण्यात पटाईतही! यामुळे मार्केटिंग कंपन्यांना सर्वच आघाड्यांवर सतत लक्ष ठेवून लवचिक धोरणे ठेवणे भाग पडते आहे. ग्राहकांच्या बदलत्या प्राधान्याक्रमांनुसार जाहिरातदारही योग्य प्रकारे सेवा पुरवून स्पर्धेत टिकून राहत आहेत. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून ग्राहकांकडे हवी ती वस्तू उपलब्ध होत आहे. वाढत्या व्यापार विस्तारामुळे क्षेत्रात करिअर करण्याचीही संधी वाढली आहे.

ML/KA/PGB 11 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *