Month: September 2023

पर्यावरण

पाण्याचं महत्त्व नेहमी लक्षात ठेवा

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क):  घरात पाण्याची गळती होणार नाही याची काळजी घ्या. घरातले बिघडलेले नळ आणि पाईप दुरुस्त करून घ्या. गावात असाल, तर जलसंधारणाच्या कामात सहभागी होणं, शहरात असाल तर इमारतीत पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था करणं (रेनवॉटर हार्वेस्टिंग) अशा गोष्टी तुम्ही करू शकता. शेती किंवा उद्योग व्यवसाय करत असाल तर त्यात पाण्याचा कमी वापर […]Read More

पर्यटन

भव्य सूर्य मंदिरासाठी देशभरात लोकप्रिय, मोढेरा

अहमदाबाद, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भव्य सूर्य मंदिरासाठी देशभरात लोकप्रिय, मोढेरा हे पुष्पावती नदीच्या काठी वसलेले एक आश्चर्यकारक विकेंड गेटवे आहे. हे मंदिर स्थापत्यकलेच्या तेजाचे एक उदाहरण आहे आणि छायाचित्रकार आणि इतिहासप्रेमींना ते आवडते. संपूर्णपणे दगडात बांधलेल्या, मंदिरात पाच घटकांचे अवशेष आहेत आणि जुन्या विश्वास प्रणालीमध्ये एक वेधक अंतर्दृष्टी आहे. मोढेराला भेट देण्याचा उत्तम काळ […]Read More

देश विदेश

कारागिलमधील द्रास युद्ध स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपासून काश्मीर दौऱ्यावर […]Read More

राजकीय

विधानसभा अध्यक्षांना सरन्यायाधिशांनी घेतले फैलावर

नवी दिल्ली,दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर) : शिवसेनेच्या ठाकरे गटाने सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने विधाससभा अध्यक्षांना या प्रकरणी निर्णय घेण्यात होणाऱ्या विलंबावर चांगलेच खडेबोल सुनावले. सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी शिवसेनेच्या सत्तासंघर्षावरील निकाल दिला होता. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, […]Read More

पर्यावरण

या राज्यात पीओपीच्या गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी कायम

नवी दिल्ली,दि.१८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलस्रोतांचे प्रचंड प्रदूषण होते. याबाबत कडक भूमिका घेत. तामिळनाडूमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मद्रास उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विक्रीवर घातलेल्या बंदीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली […]Read More

पर्यटन

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या ख्यातनाम संस्थेचा समावेश

कोलकाता, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कार्यकर्तृत्वाने विश्वविख्यात झालेल्या शांतीनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले शांतीनिकेतन हे भारतातील ४१ वे वारसा स्थळ आहे.शांतीनिकेतन पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देबेंद्रनाथ टागोर यांनी 1863 मध्ये आश्रम म्हणून शांतीनिकेतनची सुरुवात केली होती. […]Read More

देश विदेश

लाल चौकातील गणेशोत्सव मंडळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

श्रीनगर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. येथील स्थानिक मराठी सोनार समाजामार्फत गेल्या 24 वर्षांपासून येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी मंडळास गणेशमूर्ती भेट दिली.जम्मू काश्मीरवरची सर्व प्रकारची विघ्ने, संकटे दूर […]Read More

देश विदेश

श्रीनगरमध्ये ‘ हम सब एक है’ विशेष कार्यक्रम

श्रीनगर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरच्या तरुणांसाठी ‘सरहद’ संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व ते पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी काल येथे सांगितले. पुणे येथील ‘सरहद’ संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त […]Read More

साहित्य

जगाला डाव्यांच्या संकटापासून मुक्त करण्याचे दायित्व भारतावर

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जगभर विध्वंस सुरू केला असून, डाव्यांच्या या संकटापासून जगाला मुक्त करण्याचे दायित्व भारतावरच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काल पुण्यात केले. लेखक अभिजित जोग यांच्या ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते […]Read More

देश विदेश

सिराज च्या झंझावातात श्रीलंका ढेर, आशिया कप भारताकडे

कोलंबो, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):जलद गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या झंझावाती गोलंदाजी पुढे श्रीलंकन फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली आणि त्यामुळेच आशिया कप स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला आज कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियम वर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या चांगल्याच आंगाशी आला. पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराह ने श्रीलंकेची पहिली विकेट घेतली. […]Read More