सिराज च्या झंझावातात श्रीलंका ढेर, आशिया कप भारताकडे

कोलंबो, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):जलद गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या झंझावाती गोलंदाजी पुढे श्रीलंकन फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली आणि त्यामुळेच आशिया कप स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला
आज कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियम वर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या चांगल्याच आंगाशी आला. पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराह ने श्रीलंकेची पहिली विकेट घेतली.
त्यानंतर आलेल्या मोहम्मद सिराज ने आपल्या पहिल्या षटकात एक बळी मिळविला तर पुढच्या षटकात तब्बल चार फलंदाज बाद केले. यामुळे श्रीलंकेची अवस्था पाच बाद बारा धावा अशी दयनीय झाली होती.
कुशल मेंडिस आणि हेमंत हे दोनच फलंदाज दोन आकडी धावसंख्या उभारू शकले ,बाकी फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. सिराजने अवघ्या २१ धावा देत सहा बळी मिळविले तर हार्दिक पांड्या ने तीन बळी घेत त्याला चांगली साथ दिली.
१५. २ षटकात अवघ्या पन्नास धावात श्रीलंका संघ ढेर झाल्यावर जिंकण्यासाठी आवश्यक ५१ धावा भारताने एकही बळी न देता पूर्ण केल्या इशान किशन २७ आणि शुभमन गील २३ या दोघांनी हे लक्ष सहज साध्य करीत भारताला आशिया कप मिळवून दिला.
ML/KA/PGB 17 Sep 2023