Month: March 2023

अर्थ

आठवड्याच्या शेवटी बाजारात (Stock Market) जोरदार खरेदी सेन्सेक्स 950 अंकांनी

मुंबई, दि. 3 (जितेश सावंत): दिनांक 3 मार्च रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजाराला मागील आठवड्यातील काही तोटा पुसून टाकण्यात यश मिळाले व बाजार मध्यम वाढीसह बंद झाला. आठवड्याच्या सुरुवातीलाच निफ्टीने 17,353.40 ही अर्थसंकल्पीय दिवसाची खालच्या पातळी गाठली(below the Budget Day low of 17,353.40) परंतु शेवटच्या दिवशी आठवड्यातील तोटा भरून निघाला.निफ्टीने 11 नोव्हेंबर २२ नंतर […]Read More

Featured

सत्तेतून अचानक पायउतार व्हावं लागल्यानं विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सत्तेतून अचानक पायउतार व्हावे लागले त्यामुळे विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी आलेली आहे त्यामुळे त्यांना सरकारची चांगली कामं दिसतच नाहीत असं सांगत राज्यपालांच्या अभिभाषणात अनेक चांगले विषय असताना विरोधक मात्र त्याची राजकीय चर्चाच करत बसले अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली , विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला ते उत्तर देत होते. निवडणुका […]Read More

क्रीडा

उद्यापासून रंगणार महिला IPL 2023

मुंबई,दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीसीसीआयकडून महिला प्रीमियर लीगचे २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून महिला आयपीएलमधील पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन यांमध्ये होणार आहे. 4 मार्च ते 26 मार्च या दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन , युपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स […]Read More

महानगर

पालिकेकडून महिलांसाठी मोठी भेट

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेने महिलांना आपल्या जलतरण तलावांच्या सभासद शुल्कामध्ये 25 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांसाठी ही मोठी भेट असणार आहे.मुंबईत महानगरपालिकेचे चार जलतरण तलाव कार्यरत आहेत. नागरिकांना जलतरण तलावांचे सभासदत्व ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. जलतरण तलावाच्या प्रकारानुसार शुल्क आकारणी करण्यात येत असून या […]Read More

महानगर

राज्यात ४१ नवीन कौटुंबिक न्यायालये

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात दिवसेंदिवस कौटुंबिक वादांची संख्या वाढत असून कौटुंबिक न्यायालयांची अधिक गरज लक्षात घेऊन राज्यात आणखी ४१ कौटुंबिक न्यायालयाने स्थापन करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मुंबईतही आणखी १७ कौटुंबिक न्यायालयं सुरू करणार असून जिथे […]Read More

Breaking News

मुंबई-गोवा दरम्यान धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई- गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून, कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे दिल्याची माहिती भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट […]Read More

देश विदेश

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिका पार पाडणार ही जबाबदारी

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूडमध्ये मस्तानी म्हणूव प्रसिद्ध असलेली सौंदर्यवती अभिनेत्री दीपिका पदुकोण आता जागतिक पातळीवरही लोकप्रिय ठरत आहे. जगभरातील पुरस्कार सोहळ्यांसाठी तिला आवर्जून आमंत्रित केले जाते. दीपिकावर आता ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यात एक महत्त्वाती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येत्या 12 मार्च रोजी रंगणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिका पुरस्कार जाहीर करताना दिसणार […]Read More

ऍग्रो

राज्यात येत्या चार दिवसात पावसाचा इशारा

पुणे,दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी दिवसा आणि रात्री थंडी तर दुपारी पारा ३५ च्या पार असे वातावरण अनुभवास येत आहे. त्यात कालपासून बहुतांश ठिकाणी मळभ दाटून आले होते. या साऱ्या स्थितीत हवामान विभागाकडून राज्यात येत्या चार दिवसात पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही भागात मुसळधार […]Read More

Breaking News

राष्ट्रीय सुरक्षा दिवस

मुंबई, दि. 5 (जाई वैशंपायन):  ‘आजचा दिवस शून्य अपघाताचा’- बसचालकाच्या समोरच लिहिलेले हे वाक्य दररोज शंभर टक्के पाळण्याचा खरेतर आपण सर्वचजण प्रयत्न करत असतो. रस्ते सुरक्षा, कामाच्या ठिकाणची सुरक्षा, आरोग्यसुरक्षा, पर्यावरणीय सुरक्षा अशा विविध पैलूंविषयी जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून ४ मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून दरवर्षी पाळला जातो. स्वतःच्या, इतरांच्या आणि परिसराच्याही […]Read More

राजकीय

कफ सिरप उत्पादक कंपन्यांची होणार विशेष तपासणी मोहीम

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात १०८ कंपन्या कफ सिरपचे उत्पादन करतात त्यातील ८४ उत्पादकांची तपासणी करण्यात आली आहे, त्यातील १७ जणांचे नमुने त्रुटी ग्रस्त होते , पैकी ४ जणाचे उत्पादन बंद करण्यात आले आहे, ६ जणांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी […]Read More