आठवड्याच्या शेवटी बाजारात (Stock Market) जोरदार खरेदी सेन्सेक्स 950 अंकांनी वधारला.

 आठवड्याच्या शेवटी बाजारात (Stock Market) जोरदार खरेदी सेन्सेक्स 950 अंकांनी वधारला.

मुंबई, दि. 3 (जितेश सावंत): दिनांक 3 मार्च रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजाराला मागील आठवड्यातील काही तोटा पुसून टाकण्यात यश मिळाले व बाजार मध्यम वाढीसह बंद झाला. आठवड्याच्या सुरुवातीलाच निफ्टीने 17,353.40 ही अर्थसंकल्पीय दिवसाची खालच्या पातळी गाठली(below the Budget Day low of 17,353.40) परंतु शेवटच्या दिवशी आठवड्यातील तोटा भरून निघाला.निफ्टीने 11 नोव्हेंबर २२ नंतर 3 मार्च रोजी सगळ्यात मोठी इंट्राडे रॅली दाखवली. जागतिक बाजारातून मिळालेले संमिश्र संकेत,उत्तम मॅक्रो-इकॉनॉमिक डेटा,यूएस फेडच्या पुढील धोरणातील व्याजदरात वाढीबाबतची स्पष्टता, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने गाठलेला एका महिन्याच्या उच्चांक आणि अदानी समभागांमध्ये झालेल्या परकीय गुंतवणुकीचे अहवाल यामुळे सेन्सेक्सने 1000 अंकांची भरारी घेतली.
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष 10 मार्च रोजी जाहीर होणाऱ्या भारताच्या IIP data कडे असेल. 7 मार्च रोजी बाजार होळी (Holi) निमीत्त बंद राहतील.
Technical view on nifty- मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीने वर जाण्याकरिता 17517 चा स्तर तोडला शुक्रवारी निफ्टीने 17644 ची उच्चतम पातळी गाठली.येणाऱ्या आठवड्यात निफ्टी 17709-17735-17772-17801 हे स्तर गाठू शकते. निफ्टीसाठी 17427 हा स्तर अत्यंत महत्वपूर्ण राहील जर ही पातळी तोडली तर 17383-17255 हे स्तर निफ्टी गाठू शकेल.

निफ्टी १७,४०० च्या खाली.Nifty below 17,400
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक सोमवारी सलग सातव्या व्यापार सत्रात घसरले.कमजोर जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीच्या झाली आणि जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसा विक्रीचा जोर वाढला. निफ्टीने 17,353.40 ही अर्थसंकल्पीय दिवसाची खालच्या पातळी गाठली(below the Budget Day low of 17,353.40) शेवटच्या तासाच्या रिकव्हरीने काही प्रमाणात तोटा कमी झाला.गेल्या पाच महिन्यांतील सततच्या घसरणीचा हा सर्वात मोठा कालावधी ठरला. माहिती तंत्रज्ञान (IT), ऑटो आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या समभागांची विक्री आणि विदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना विचलित झाल्या. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 175 अंकांनी घसरून 59,288 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 73 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,392 चा बंद दिला.
सलग आठव्या ट्रेडिंग सत्रात बाजार घसरणीसह बंद झाला.
अत्यंत शांत सुरुवातीनंतर बाजार सकाळी एका विशिष्ठ पातळीभोवती राहिला परंतु दुपारी झालेल्या विक्रीने निर्देशांक खाली खेचले गेले, निफ्टी दिवसाच्या 17,250 च्या नीचांकी पातळीवर घसरला.संमिश्र जागतिक संकेत, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी दिवसाच्या उत्तरार्धात जाहीर होणार्‍या जीडीपी आकड्यांपूर्वी सावधगिरी बाळगल्याने बाजारात घसरण सुरूच राहिली.भारतीय बाजार सलग आठव्या सत्रात घसरला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 326 अंकांनी घसरून 58,962 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 88 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,304 चा बंद दिला.
सेन्सेक्स ४४९ अंकांनी वधारला.Sensex up 449 points
सलग आठ दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात तेजीची वापसी झाली. बाजाराने मार्च महिन्याची सुरुवात मजबूत केली आणि जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसा नफा वाढवला.चांगली वाहन विक्री संख्या आणि फेब्रुवारीमधील जीएसटी संकलनाचे 1.5 कोटी रुपये यामुळे रॅलीमध्ये आणखी वाढ झाली. बाजारात मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली. निफ्टीवरील धातू निर्देशांक सुमारे 4 टक्क्यांनी वाढला. बँक, आयटी, रिअल्टी निर्देशांकही 1 टक्क्यांहून अधिक मजबूत झाले. इतर क्षेत्रातही खरेदी झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 448 अंकांनी वधारून 59,411 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत146 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,450 चा बंद दिला.
बाजार पुन्हा कोसळला, सेन्सेक्स ५०१ अंकांनी घसरला. Bears back in action, Sensex down 501
मागील सत्रातील दिलासादायक रॅली नंतर गुरुवारी जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बाजारात घसरण पाहावयास मिळाली. बाजाराची सुरुवात शांतपणे झाली परंतु दिवस जसजसा पुढे सरकत गेला तशी विक्री वाढत गेली. मागील सत्रातील सर्व नफा मिटवून बाजार बंद होताना दिवसाच्या खालच्या पातळीच्या जवळ पोहोचला.आयटी आणि बँक समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारावर दबाव वाढला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 501 अंकांनी घसरून 58,909 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 129 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,321 चा बंद दिला.

सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला.Sensex zooms 900 points
अमेरिकन मार्केटमधील तेजीचा असर शुक्रवारी भारतीय बाजारावर होताना दिसला. मजबूत सुरुवातीनंतर, दिवस जसजसा पुढे जात होता तसतसा बाजाराने नफा वाढवला. सेन्सेक्स 1,000 अंकातून अधिक वाढला.अदानी समूहाच्या शेअर्समधील सलग चौथ्या दिवशी झालेली तेजी.बँक, वित्तीय आणि धातू समभागांमध्ये झालेली जोरदार खरेदी हि बाजाराच्या वाढीची प्रमुख कारणे ठरली..यूएस फेडच्या पुढील धोरणात व्याजदरात ५० बेसिस पॉईंट्सने वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण आता अशी स्पष्टता आली आहे की व्याजदर 25 बेसिस पॉईंटने वाढतील.हे देखील बाजाराच्या वाढीस कारणीभूत ठरले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 899.62 अंकांनी वधारून 59,808.97 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 272.40 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,594.30चा बंद दिला.

(लेखकशेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
3 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *