Month: March 2023

महानगर

अवकाळी पावसाचा पोलीस भरतीच्या उमेदवारांना फटका

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बसला आहे.आज मंगळवार 21 मार्च रोजी मुंबईत होणारी पोलीस भरतीची मैदानी चाचणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.मुंबई पोलीस शिपाई भरती – 2021 मधील मैदानी चाचणी 6 फेब्रुवारी 23 पासून सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतंर्गत 21 मार्च रोजी मैदानी […]Read More

राजकीय

धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करणारच …

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेतील अटी शर्तीनुसार ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यालाच हे काम करता येईल त्यामुळे अडाणी समूहाने ते सिध्द केल्यानंतरच त्यांना कामाचे आदेश देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. यासंदर्भातील लक्षवेधी सूचना वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केली होती, त्यावर सुनील केदार, जयंत […]Read More

Uncategorized

गुढी पाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यपाल रमेश बैस यांनी गुढी पाडवा तसेच नववर्षानिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा गुढीपाडवा आणि नववर्ष राज्यातील लोकांसोबत साजरे करताना विशेष आनंद होत आहे. देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटी चंड म्हणून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. हा सण सर्वांच्या जीवनात […]Read More

ऍग्रो

कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी डिजीटल स्वरुपातील पहिली योजना

मुंबई दि.21 (एम एमसी न्यूज नेटवर्क): एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) योजनेचा शुभारंभ केला आहे. कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी अशा प्रकारची आणि डिजीटल स्वरुपातील पहिली वित्तसहाय्य योजना आहे. वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग (डब्लूआरएफ) कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून […]Read More

आरोग्य

गरीब रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा हा सभागृहाचा अवमान

मुंबई, दि २१-: धर्मादाय आयुक्त यांच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींकडून देखील विधिमंडळात यासंदर्भातील अडीअडचणी सातत्याने मांडल्या जात आहेत. राज्यातील अशा चारशे रुग्णालयांकडून दुर्बल घटकांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारे दिरंगाई होणार नाही, अशी व्यवस्था तातडीने निर्माण केली जावी तसेच यासंदर्भात […]Read More

महानगर

एक लाख मुंबईकर कार्यकर्त्यांच्या घरी हिंदुत्ववाची गुढी

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदूच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा भाजपा मुंबईच्या वतीने दणक्यात साजरा करण्यात येणार असून मुंबईत भाजपाचे कार्यकर्ते एक लाख गुढ्या उभारुन हिंदू नववर्षाचे स्वागत करणार आहेत, अशी माहिती भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आज भाजपा […]Read More

राजकीय

सीमाभागातील आरोग्य योजनांचा निधी रोखण्याचा मुद्दा विधानपरिषदेत

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर, सीमावर्ती भागातील लोकांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेला ५४ कोटींचा निधी रोखण्याच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. कर्नाटकच्या मनमानीविरोधात उपसभापती नीलम गोर्हे यांनी दहा मिनिटं सभागृह तहकूब करून कर्नाटक सरकारचा निषेध केला.यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत , ही बाब […]Read More

महानगर

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतचे उद्दिष्ट राज्याबाहेर गेलेले नाही

मुंबई दि २१– प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्याच्या घरांचं उद्दिष्ट इतर राज्यात वळवण्यात आलेलं नाही ,एकही घर दुसऱ्या राज्यात गेलेलं नाही असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. ३१ डिसेंम्बर २०२२ पर्यंत घरांचं उद्दिष्ट कालबद्ध रीतीने पूर्ण करण्यासाठी केंद्र […]Read More

पर्यावरण

अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांना फटका

अलिबाग, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, खालापूर, खोपोली, अलिबाग, रोहा, पाली, नागोठणे, कोलाड याठिकाणी मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मागच्या काही दिवसापासून हवामानात सारखा चढ उतार होत असल्याने उष्णतेमध्ये भयंकर वाढ झाली त्यामुळे हवामानात बदल होऊन कधी ऊन कधी सावली पडत असल्याने अखेर आज पेणमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी […]Read More

विदर्भ

नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन…

नागपूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात धमकीचे हे फोन आले आले असून 10 कोटी रुपये खंडणी मागण्यात आली आहे . आज सकाळी तीनदा लँड लाईन वर आले फोन आल्याचे सांगण्यात येत असून यापूर्वीही 14 जानेवारी […]Read More