Month: May 2022

Featured

Pre-monsoon rain : देशात मान्सूनपूर्व पावसात घट, कधी येणार मान्सून

नवी दिल्ली, दि. 20  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, देशात मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीत घट झाली आहे. देशातील 12 राज्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात 1 मार्च ते 17 […]Read More

ऍग्रो

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. 19 : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करत यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे cm uddhav thakrey यांनी आज दिले. तसेच शेतकरी बांधवांच्या […]Read More

ऍग्रो

mustard oil : मोहरी, शेंगदाणा तेलाचे दर घसरले; सोयाबीन तेलाचे

नवी दिल्ली, दि. 19  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईने वैतागली आहे. दुसरीकडे, थोडा दिलासा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. मात्र, खाद्यतेलाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोयाबीन तेल, सीपीओ, कापूस बियाणे आणि पामतेलाचे भाव घसरले. मोहरी आणि शेंगदाणा तेलाचे दर मात्र स्थिर राहिले. तज्ज्ञांच्या मते, बाजारात सोयाबीनशिवाय तेलबियांना […]Read More

मराठवाडा

दुष्काळी भागात दाम्पत्याने केली ३५ गुंठ्यात यशस्वी शेती

बीड, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्हाचं नाव आलं की समोर दुष्काळ अन‌् शेतकऱ्यांच्या आत्महत्या आठवतात. बहुतांश हे खरं जरी असलं तरी याच जिल्ह्यात अल्पभूधारक काळे शेतकरी दाम्पत्याने पुदिना आणि दुधी भोपळ्याची २५ वर्षांपासून यशस्वी सेंद्रिय शेती केलीय. बीड शहरापासून अगदी पंधरा किलोमीटर अंतरावर Just fifteen kilometers from the city of Beed असलेलं नाळवंडी […]Read More

Featured

Monsoon Updates: अंदमान निकोबारमध्ये चांगल्या मान्सूनचे संकेत 

नवी दिल्ली, दि. 16  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतीसाठी मान्सूनची सुरुवातीची चिन्हे चांगली दिसत आहेत. वृत्तानुसार, नैऋत्य मान्सून सोमवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढे सरकला आहे. चार महिने हंगामी पाऊस सुरू होण्याची चिन्हे चांगलीच दिसत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मुख्यत्वे शेतीवर अवलंबून असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हवामान खात्याने सांगितले की, अंदमान […]Read More

Featured

सलग दुसऱ्या आठवडयात भारतीय बाजार (Stock Market) ४ टक्क्यांनी घसरला.

मुंबई, दि. 14 (जितेश सावंत ) : सलग दुसऱ्या आठवड्यात भारतीय बाजार आणखी ४ टक्क्यांनी घसरला आणि सलग पाचव्या आठवड्यात घसरणीचा सिलसिला चालूच ठेवला. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढती महागाई. गुंतवणूकदार जगभरातील वाढत्या महागाईबद्दल चिंतेत होते व परिणामी त्यांनी विक्रीचा मार्ग स्वीकारला. जागतिक मध्यवर्ती बँकांद्वारे पुन्हा दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांच्या काळ्जीत भर पडली. […]Read More

ऍग्रो

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी प्रदर्शनाचे उद्घाटन

रत्नागिरी, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे आणि अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल असे प्रतिपादन महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण […]Read More

ऍग्रो

गव्हाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत नऊ देशांमध्ये पाठवणार व्यावसायिक शिष्टमंडळ  

नवी दिल्ली, दि. 13  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गव्हाच्या निर्यातीला चालना देण्याच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी भारत मोरोक्को, ट्युनिशिया आणि इंडोनेशियासह नऊ देशांमध्ये व्यावसायिक शिष्टमंडळे पाठवेल. 2022-23 मध्ये देशाने 10 दशलक्ष टन गहू निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, विविध मंत्रालयांच्या प्रतिनिधींसह गव्हाच्या निर्यातीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. या […]Read More

ऍग्रो

बीजोत्पादनात महात्मा फुले कृषि विद्यापीठ ठरले देशात पहिले

अहमदनगर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, Mahatma Phule Agricultural University राहुरी येथील बिजोत्पादन प्रकल्पाला माउ, उत्तर प्रदेश येथील भारतीय बीज अनुसंधान संस्था येथे झालेल्या 37 व्या वार्षिक बिजोत्पादन आढावा बैठकीत देशात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या बैठकीसाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे बियाणे विभागाचे सहायक निदेशक […]Read More

ऍग्रो

वाढत्या तापमानामुळे संत्र्याला गळती, शेतकरी हवालदिल

नागपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर जिल्हा संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. या वेळेला संत्राला आंबिया बहर चांगला आलेला होता ज्यामुळे शेतकरी सुखावला होता वाटत होते त्याला यावेळेला चांगला नफा होईल पण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सतत वाढत असलेल्या तापमानामुळे संत्राला गळती लागणे सुरू झाले आहे.Due to […]Read More