वाढत्या तापमानामुळे संत्र्याला गळती, शेतकरी हवालदिल

 वाढत्या तापमानामुळे संत्र्याला गळती, शेतकरी हवालदिल

नागपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर जिल्हा संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. या वेळेला संत्राला आंबिया बहर चांगला आलेला होता ज्यामुळे शेतकरी सुखावला होता वाटत होते त्याला यावेळेला चांगला नफा होईल पण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सतत वाढत असलेल्या तापमानामुळे संत्राला गळती लागणे सुरू झाले आहे.Due to rising temperatures, oranges are falling, farmers are worried

काटोल, नरखेड, कळमेश्वर या भागात मोठ्या प्रमाणात वाढत्या तापमानामुळे गळती सुरू आहे. नागपूरचे तापमान 43 ते 45 अंश तापमान असून ज्यामुळे पशु, पक्षी नागरिक हैराण आहे तेथे आता शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. जवळपास 40 ते 50 टक्के संत्राचा आंबिया बहर खाली आलेला आहे अजूनही मे महिन्याचे 19 दिवस बाकी आहेत. यात आणखी किती गळ होते हे सांगता येत नाही.

पाऊस लवकर येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी देखील वाढत्या तापमानाचा फटका impact of rising temperatures जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच बसला आहे.

ML/KA/PGB

12 May 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *