Pre-monsoon rain : देशात मान्सूनपूर्व पावसात घट, कधी येणार मान्सून जाणून घ्या

 Pre-monsoon rain : देशात मान्सूनपूर्व पावसात घट, कधी येणार मान्सून जाणून घ्या

नवी दिल्ली, दि. 20  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, देशात मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीत घट झाली आहे. देशातील 12 राज्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात 1 मार्च ते 17 मे दरम्यान 73 टक्के कमी मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे.

पुरेसा मान्सूनपूर्व पाऊस झाल्यास खरीप पिकांना मोठी चालना मिळते.  शेतीच्या कामाला सुरुवात होते. मान्सूनपूर्व पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. मान्सूनपूर्व पावसाने भाजीपाला व इतर पिकांनाही दिलासा मिळाला असतो. मात्र, कमी पावसामुळे भाजीपाला उत्पादनावरही परिणाम झाला आहे. नैऋत्य मोसमी वारे हे असे वारे आहेत जे भारताच्या नैऋत्येकडून विशिष्ट ऋतूंमध्ये वाहतात आणि भारतात मुसळधार पाऊस पाडतात.

12 जून ते 15 जून या कालावधीत मान्सून दाखल होईल

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात पाऊस पडेल. पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.

मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात 7 जून ते 8 जून दरम्यान मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे. 12 जून ते 15 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सूनच्या पावसाची शक्यता आहे.

पावसामुळे काहीसा दिलासा

राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह चांगला पाऊस झाला.

उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

HSR/KA/HSR/20  MAY  2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *