भांडवली बाजाराला (Stock Market) पाच आठवडयांची घसरण थांबवण्यात यश.

 भांडवली बाजाराला (Stock Market) पाच आठवडयांची घसरण थांबवण्यात यश.

मुंबई, दि. 21 (जितेश सावंत ) : अत्यंत अस्थिर अश्या आठवडयाच्या शेवटी भारतीय निर्देशांकांनी पाच आठवडय़ांची घसरण थांबवण्यात यश मिळवले.शेवटच्या दिवशी बुल्सने दलाल स्ट्रीटची सूत्रे आपल्या हातात घेतली. आठवडय़ाची पहिली दोन सत्रे सकारात्मकतेवर संपल्यानंतर भारतीय इक्विटी बाजार पुन्हा लाल रंगात परतला. यूकेच्या (UK) वाढत्या महागाईच्या आकड्यांमुळे गुंतवणूकदारांच्या भावना विचलित झाल्या गुंतवणूकदारानी नफावसुलीला प्राधान्य दिले. इंधनातील वाढ, वाढती जागतिक महागाई, मंदीचे सावट, व फेडचे कडक धोरण यामुळे जागतिक बाजारावर दबाव जाणवला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) विक्री सुरूच ठेवली.

परंतु आठवडयाच्या शेवटच्या दिवशी बाजाराने स्मार्ट रिकव्हरी केली. शांघायच्या आर्थिक हबमध्ये कोविडची परिस्थिती कमी होण्यास सुरुवात झाल्याचे संकेत दिसल्याने व चीनने वाढीला चालना देण्यासाठी पाच वर्षांच्या कर्जाचा प्राइम रेट ४.६ टक्क्यांवरून ४.४५ टक्क्यांपर्यंत कमी केल्यामुळे तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षात भारताची आर्थिक वाढ मजबूत आहे आणि ती ८.९% राहण्याचा अंदाज आहे असे सांगितल्याने बाजाराचा आत्मविश्वास वाढला. Finance Minister Nirmala Sitharaman on Thursday said that Indias economic growth in the current financial year has been robust and is estimated to be 8.9% which is the highest among all large economies.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष रविवारपासून दावोस येथे सुरु होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक(davos world economic forum) ,कंपन्यांच्या तिमाही निकालांचा शेवटचा आठवडा,सिंगापुर,हॉंगकॉंगचे CPI चे आकडे,FOMC minutes या कडे असेल

मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे बाजार तांत्रिकदृष्ट्या कमजोर असल्याने निफ्टीने १५,७०० च्या आसपास तळ गाठला.व वरती १६,३०० च्या जवळपास गेला. या आठवडयात वरच्या स्तरावर निफ्टीसाठी १६,३००-१६,४०० हे अत्यंत महत्वपूर्ण स्तर आहेत हे स्तर जर पार झाले तर निफ्टी १६,७०० चा स्तर गाठू शकते.खाली १६,१०० हा स्तर महत्वपूर्ण राहील.

बाजाराने सहा दिवसांचा मंदीचा सिलसिला मोडला. Market snaps six-day losing streak
आठवडयाच्या पहिल्याच दिवशी सलग सहा दिवसांच्या नकारात्मकते नंतर बाजार वधारला. बाजार चढउतार होत असताना सुद्धा बाजाराने सकारात्मकता टिकवून ठेवली.information technology आणि FMCG वगळता सर्व क्षेत्रांतील खरेदीमुळे बाजार वर गेला. दिवसाच्या उत्तरार्धात काही प्रमाणात नफा वसुली झाली. परंतु बाजार हिरव्या रंगात बंद होण्यात यशस्वी झाला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १८० अंकांनी वधारून ५२,९७३ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ६० अंकांची वाढ होऊन निफ्टीने १५,८४२ चा बंददिला.

सेन्सेक्स १,३४५ अंकांनी वधारला. एलआयसीची पदार्पणात निराशा.Sensex gains1,345 points, LIC sinks on debut
सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजाराने तेजीचा सिलसिला कायम ठेवला. परंतु संपुर्ण बाजाराचे लक्ष असलेला लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या म्हणजेच LIC ने पदार्पणाच्या दिवशी गुंतवणूकदारांची निराशा केली( LIC चा शेअर बंद होताना ७.७% घसरणीने बंद झाला.) तरी देखील बाजार आपली तेजी कायम राखण्यात यशस्वी ठरला. सेन्सेक्स १,४०० अंकांनी वधारला.बाजाराच्या तेजीला मेटल,बँकिंग,ऑटो,पीएसयू बँक,एनर्जी,आय.टी.फार्मा या क्षेत्रातील वाढीचा हातभार लागला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १,३४४ अंकांनी वधारून ५४,३१८ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ४१७ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १६,२५९चा बंददिला.
मंगळवारी आशियाई बाजार देखील वाढले. गुंतवणूकदारांनी कोविडचा उद्रेक रोखण्यासाठी चीनच्या प्रयत्नांचे मूल्यांकन केल्यामुळे मंगळवारी आशियाई बाजार देखील वाढले(Asian shares advanced on Tuesday, boosted by some tech stocks and as investors evaluated Chinas efforts to stamp out a Covid outbreak.)
महागाईच्या आकड्यात मात्र वाढ होतानाच दिसली एप्रिल २०२२ चा घाऊक किंमत निर्देशांक (WPI)१५.८% असा जाहीर झाला. १९९८ नंतर प्रथमच घाऊक महागाई १५ टक्क्यांच्या वर जाताना दिसली. घाऊक महागाई सलग १३ व्या महिन्यात दुहेरी अंकात नोंदवण्यात आली.(Indias inflation based on wholesale price index (WPI) stood at 15.08% in April 2022 compared with 10.74% in April 2021)

दोन दिवसांच्या वाढीनंतर भारतीय इक्विटी बाजार पुन्हा लाल रंगात.
दोन दिवसांच्या वाढीनंतर बुधवारी अत्यंत अस्थिर अश्या सत्रात भारतीय इक्विटी बाजार पुन्हा लाल रंगात परतला.मागील सत्रातील तीव्र वाढीनंतर भारतीय निर्देशांकांनी दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने केली परंतु दुपारनंतर रियल्टी, पीएसयू बँक आणि आयटी समभागातील नफा-वसुलीमुळे निर्देशांक खाली आले. युरोपियन बाजाराची कमजोर सुरुवात होईपर्यंत देशांतर्गत बाजारात स्थिरता होती.यूकेच्या वाढत्या महागाईच्या आकड्यांमुळे गुंतवणूकदारांच्या भावना विचलित झाल्या. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १०९ अंकांनी घसरून ५४,२०८ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १९ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १६,२४०चा बंददिला.

सेन्सेक्स व निफ्टीत २.५% पेक्षा जास्त घसरण.Sensex, Nifty slump over 2.5%
कमकुवत जागतिक बाजाराच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारतीय बाजाराने फ्री-फॉल बघितला. भारतीय इक्विटी मार्केटमध्ये मागील सत्रातील नफावसुली सुरूच राहिली. गॅप-डाऊन स्टार्टनंतर, निर्देशांक संपूर्ण सत्रात नकारात्मक राहिले व बाजार बंद होताना दिवसाच्या खालच्या स्तरा जवळच बंद झाला. बाजारात चहुबाजूनी विक्रीचा मारा झाला. अमेरिकेमधील रिटेल कंपनीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात महागाईच्या वाढीचा असर साफ दिसून आला.इंधनातील वाढ, वाढती जागतिक महागाई, मंदीचे सावट, व फेडचे कडक धोरण यामुळे जागतिक बाजारावर दबाव जाणवला. सेन्सेक्समध्ये १५०० अकांची घसरण झाली. निफ्टीने १५,७७५ चा स्तर गाठला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १,४१६ अंकांनी घसरून ५२,७९२ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ४३० अंकांची घसरण होऊन निफ्टीने १५,८०९ चा बंददिला.

बाजार उसळला, सेन्सेक्स, निफ्टी 3% वाढले. Market bounces back; Sensex, Nifty gain 3%
शुक्रवारी बाजाराने चांगलेच कमबॅक केले.भारतीय बेंचमार्कने आदल्या दिवशीचा तोटा भरून काढला बाजाराने स्मार्ट रिकव्हरी केली. मजबूत जागतिक संकेत आणि सर्व क्षेत्रांमधील खरेदी यांच्यामुळे निर्देशांकात जवळपास ३ टक्क्यांनी वाढ झाली.शांघायच्या आर्थिक हबमध्ये कोविडची परिस्थिती कमी होण्यास सुरुवात झाल्याचे संकेत दिसल्याने चीनने वाढीला चालना देण्यासाठी पाच वर्षांच्या कर्जाचा प्राइम रेट ४.६ टक्क्यांवरून ४.४५ टक्क्यांपर्यंत कमी केल्यामुळे आशियाई बाजार उच्च पातळीवर उघडले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात भारताची आर्थिक वाढ मजबूत आहे आणि ती ८.९% राहण्याचा अंदाज आहे व जी सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. यामुळे बाजाराचा आत्मविश्वास वाढला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १,५३४ अंकांनी वधारून ५४,३२६ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ४५६ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १६,२६६चा बंददिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

21 May 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *