साखर निर्यातीत विक्रमी वाढ

 साखर निर्यातीत विक्रमी वाढ

कोल्हापूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातून चालू आर्थिक वर्षात 90 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यात येणार आहे.The country will export 90 lakh metric tonnes of sugar in the current financial year. विशेष म्हणजे १८ मे पर्यंत यातील ७५ लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.

२०१७-१८ मध्ये निर्यात करण्यात आलेल्या ६.२ लाख मेट्रिक टनाच्या तुलनेत हे प्रमाण १५ पटींनी अधिक आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये साखर निर्यातीचा आलेख बराच उंचावला आहे.केंद्रीय ग्राहक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१८-१९ मध्ये ३८ लाख मेट्रिक टन, २०१९-२० मध्ये ५९.६ लाख मेट्रिक टन आणि २०२०-२१ मध्ये ७० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यात आली.

चालू आर्थिक वर्षात 355 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन घेण्यात आलं आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण तीनशे दहा लाख मेट्रिक टन होतं. इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, मलेशिया आणि आफ्रिकन देश हे साखरेचे प्रमुख आयातदार देश आहेत.

साखरेची निर्यात सुलभ करण्यासाठी गेल्या ५ वर्षांमध्ये साखर कारखान्यांना जवळपास १४ हजार ४५६ कोटी तर बफर साठ्यासाठी वहन खर्च म्हणून २ हजार कोटी रुपये जारी करण्यात आले.

साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमती चढ्या आणि स्थिर असल्याने, चालू साखर हंगाम २०२१-२२ मध्ये साखर निर्यात करण्यासाठी सुमारे ९० लाख मेट्रिक टन निर्यातीचे करार करण्यात आले आहेत.Due to high and stable international sugar prices, about 9 million metric tonnes of sugar has been exported in the current sugar season 2021-22.

ML/KA/PGB

21 May 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *