कोल्हापूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने दोन महिन्यात आज (11 मार्च) तिसऱ्यांदा छापेमारी केली. अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून 4 वाजून 35 मिनिटांनी बाहेर पडले. आज झालेल्या कोल्हापूरात छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली.अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून 4 वाजून 35 मिनिटांनी बाहेर […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. या उद्देशाने राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर इनिशिएटिव तसेच लीडरशिप फोर इक्विटी या दोन संस्थांसमवेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक […]Read More
अहमदनगर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या दोन वर्षांमध्ये राज्यातील 30 टक्के फिडर हे आमचं सरकार सोलरवर आणणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि शेतकऱ्यांना शेती करताना होणारी गैरसोय दूर होईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कन्हैया ऍग्रो कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन […]Read More
पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह पाहणी केली. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५ जी) हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – […]Read More
पंढरपूर,दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अखिल महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आता इच्छूक भाविकांना मोफत सेवा देता येणार आहे. मंदिर समितीकडून काही अटी आणि शर्तीच्या आधारे भाविकांना प्रायोगिक तत्वावर सेवेची संधी देण्याचा विचार करत आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली. मंदीरात सध्या […]Read More
इन्फोसिस या लोकप्रिय टेक कंपनीचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोहित जोशी गेल्या २२ वर्षांपासून इन्फोसिस कंपनीमध्ये काम करत होते. जून २०२३ पर्यंतच ते इन्फोसिसमध्ये काम करणार आहेत. इन्फोसिसमधून बाहेर पडल्यावर मोहित जोशी Tech Mahindra कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून काम पाहणार आहेत.टेक महिंद्रा कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून कोकणात मळभाचे वातावरण आणि भणाणता वारा असे हवामान अनुभवास येत आहे. अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकरी काहीसे धास्तावले होते. मात्र आता मळभाची स्थिती दूर होऊन येत्या आठवड्यात कोकणात उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, आणि […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) ने कनिष्ठ अभियंता आणि इतर पदांची भरती केली आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण 73 पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), गुवाहाटी, आसाम साठी आहेत. उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2023 असेल. शैक्षणिक पात्रता संबंधित क्षेत्रातील अनुभव […]Read More
मुंबई, दि. 11 (जितेश सावंत): जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आठवड्याच्या सुरुवातीला दमदार सुरुवात होऊन देखील फेड दरवाढीबद्दल वाढलेल्या चिंतेमुळे बाजाराच्या आठवड्याचा शेवट मोठ्या घसरणीने झाला.यूएस फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या पुढील काळात मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे अशी टिप्पणी केल्याने त्याचे पडसाद जागतिक बाजारावर उमटले व गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली.बाजार स्वतःला सावरू शकला […]Read More
पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक […]Read More