mmcnews mmcnews

राजकीय

सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग रोखा , विरोधी पक्ष न्यायालयात

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणांच्या होणारा दुरुपयोग रोखण्यासाठी देशातील १४ विरोधी पक्ष एकवटले आहेत. विरोधी पक्षांनी सामूहिकपणे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका स्वीकारण्यात आली असून या याचिकेवर 5 एप्रिलला सुनावणी होणार आहे. यापूर्वी विरोधी पक्षांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही पत्र लिहिलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 राजकीय […]Read More

Breaking News

प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरी

सांगली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हीने अंतिम लढत जिंकून पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे तर्फे यंदा प्रथमच आयोजन करण्यात आले होते. कालपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती […]Read More

देश विदेश

राष्ट्रीय पेन्शन योजना अधिक उपयुक्त करण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून मोठा निर्णय

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यभरात उठलेले आंदोलनांचे वादळ नुकतेच शमले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत आज लोकसभेत वित्त विधेयक सादर करताना करणारा घेतलेला निर्णय देशातील सर्वच राज्य सरकारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत समिती स्थापन करण्यात येईल. वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही […]Read More

राजकीय

प्रकल्पग्रस्तांसाठी आता सर्वंकष धोरण

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण राज्य सरकार आणेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासाठी तसंच त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सरकार […]Read More

करिअर

झारखंड कर्मचारी निवड मंडळामध्ये शिक्षकांच्या 3120 पदांसाठी भरती

झारखंड, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  झारखंड कर्मचारी निवड मंडळाने TGT आणि PGT पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे TGT आणि PGT च्या एकूण 3120 रिक्त पदे भरली जातील. या पदांसाठी उमेदवार ५ एप्रिलपासून अर्ज करू शकतात. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मे 2023 ही निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता […]Read More

Lifestyle

साबुदाण्याची खीर कशी बनवायची

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जर तुम्ही चैत्र नवरात्रीतही उपवास ठेवणार असाल तर यावेळी तुम्ही गोड पदार्थात साबुदाण्याची खीर करून पाहू शकता. या गोड पदार्थाची चव सर्वांनाच आवडेल. जर तुम्ही आजपर्यंत साबुदाणा खीरची रेसिपी कधीच करून पाहिली नसेल, तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने अगदी सहज बनवू शकता. साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी साहित्यसाबुदाणा – […]Read More

महानगर

फोडा आणि झोडा ही सत्ताधाऱ्यांची सध्याची निती

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात गुंडगिरी वाढली आहे, धार्मिक तेढ वाढली आहे. फोडा आणि झोडा अशी निती सत्ताधाऱ्यांनी राबवायला सुरुवात केली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत आज केला. विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाची सुरूवात करताना ते बोलत होते. राज्यात धमक्यांचे सत्र सुरू आहे त्यातून खुद्द […]Read More

Featured

गडकरी प्रकरणी बेळगावच्या हिंडलगा जेल वर पोलिसांचा छापा

बेळगाव, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘गुगल पे’वर 10 कोटी पाठवा आणि पोलिसांना सांगू नका, अशा आशयाचा फोन बेळगावच्या तुरुंगातील कुख्यात आरोपीने दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी सकाळी केला. जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असे फोन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने यापूर्वी 14 जानेवारी 2023 रोजी गडकरींच्या कार्यालयात तीन फोन केले होते. त्यावेळी […]Read More

राजकीय

खोटी कागदपत्रे तयार करून केली तब्बल ६५ बांधकामे

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट असलेल्या २७ गावातील ६५ विकासकांनी महापालिकेची खोटी कागदपत्रे तयार करून बांधकामे रेरा मध्ये नोंदणी करून बांधली त्यासाठी विशेष तपास समिती नेमली आहे, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संबधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. याबाबतची […]Read More

Featured

आशा भोसले यांना प्रदान होणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात “‘चतुरस्र” हा शब्दही थीटा पडावा अशी चौफेर कामगिरी बजावत, गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशाताई भोसले यांना आज सायंकाळी एका भव्यदिव्य सोहळ्यात राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अश्या महाराष्ट्र भूषण […]Read More