सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग रोखा , विरोधी पक्ष न्यायालयात

 सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग रोखा , विरोधी पक्ष न्यायालयात

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणांच्या होणारा दुरुपयोग रोखण्यासाठी देशातील १४ विरोधी पक्ष एकवटले आहेत. विरोधी पक्षांनी सामूहिकपणे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका स्वीकारण्यात आली असून या याचिकेवर 5 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

यापूर्वी विरोधी पक्षांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही पत्र लिहिलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 राजकीय पक्षांनी विरोधी नेत्यांना अटक करण्यासाठी केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआयचा मनमानीपणाने वापर केल्याचा आरोप केला आहे.

वरिष्ठ अधिवक्ता अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात सांगितले की, विरोधी पक्ष अटकपूर्व प्रक्रियेसाठी तपास यंत्रणा आणि अटकेनंतरच्या प्रक्रियेसाठी अभियोक्ता आणि न्यायालयांनी अनुसरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करत आहेत. भाजपमध्ये आल्यानंतर अनेकदा नेत्यांवरील खटले बंद होतात किंवा तपास पुढे सरकत नाही, असेही विरोधी पक्षांनी म्हटले आहे.

दरम्यान सरकारी यंत्रणा एजन्सी स्वतंत्रपणे काम करत असल्याचे सांगत भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. सिंघवी यांनी कोर्टात सांगितले की, 95 टक्के खटले विरोधी नेत्यांविरोधात आहेत. आम्ही अटकपूर्व आणि अटकेनंतरच्या मार्गदर्शक तत्त्वांची मागणी करत आहोत.

SL/KA/SL

24 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *