मुंबई, दि १८: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील दोन लाख आयटीआयच्या विद्यार्थ्यांना टप्याटप्याने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा दीर्घ अनुभव असलेल्या ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ आणि कौशल्य विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात आज यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सशक्त […]Read More
पुणे, दि १८: लोणी-काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा बहुप्रतिक्षित वार्षिक टेक्नो-कल्चरल फेस्टिव्हल ‘पर्सोना फेस्ट–२०२६’ आजपासून सुरू होत असून हा भव्य महोत्सव १९ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात देशभरातील १३० हून अधिक महाविद्यालये व विद्यापीठांमधील सुमारे २० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाची अपेक्षा आहे. या महोत्सवाचे उद्घाटन […]Read More
पुणे, दि १८: जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी मराठी भाषा दिन अभिमानाने साजरा केला जातो. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हा अभिमान अधिकच वृद्धिंगत झाला आहे. या ऐतिहासिक गौरवाचा विस्तार आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याच्या उद्देशाने मॉरिशस येथे २७ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२६ या कालावधीत “मोगरा फुलला” या भव्य आंतरराष्ट्रीय सांगीतिक व सांस्कृतिक सोहळ्याचे […]Read More
मुंबई दि १८ : भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांना आज (बुध. १८) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाची शपथ देण्यात आली. लोकभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भीमनवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमनवार यांचे पुष्पगुच्छ देऊन […]Read More
मुंबई, दि. १८ : कोकण किनारपट्टी व पठारावर आढळणाऱ्या हजाराहून अधिक प्राचीन कातळशिल्पांच्या (जिओग्लिफ्स) सखोल संशोधन, दस्तऐवजीकरण आणि संरक्षणासाठी ‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ स्थापन करण्यात आला असून यासाठी शासनाकडून एकूण 14 कोटी 62 लाख 32 हजार 671 रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. […]Read More
वनजमिनीवरील रहिवाशांचे पुनर्वसन आणि म्हाडाच्या३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत मंत्रालयात बैठक संपन्न
मुंबई, दि १७- वनजमिनीवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत आणि म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासासंबंधी आज मंगळवारी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) आ. प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विषयावर बोलताना दरेकर म्हणाले की, येथे अनेक […]Read More
चंद्रपूर, दि १७चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्याची मागणी आ सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की चंद्रपूर शहराला सुमारे ८०० हून अधिक वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड राजवटीपासून भोसलेकालीन परंपरेपर्यंत या शहराने सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक […]Read More
मुंबई, दि. १७: अहमदाबाद येथून मुंबई सेंट्रल येथे येणाऱ्या ‘वंदे भारत’ या सुपरफास्ट वातानुकूलित एक्स्प्रेस मध्ये जी उद्घोषणा करण्यात येते त्यात यापुढे मराठी भाषेवर अन्याय होऊ देणार नाही, मराठी भाषेत सर्वप्रथम उद्घोषणा करण्यात येईल, यासाठी उद्याच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात येईल असे निःसंदिग्ध आश्वासन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज […]Read More
मुंबई, दि १७ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सखोल स्वच्छता मोहिमेचे तसेच फेरीवाला-मुक्त रस्ते व पदपथ धोरणाचे सकारात्मक व प्रत्यक्ष परिणाम आता नागरिकांना प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. सातत्यपूर्ण व काटेकोर अंमलबजावणीमुळे विविध प्रशासकीय प्रभागांतील रस्ते पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ, नीटनेटके व सुशोभित स्वरूपात दिसून येत आहेत. घनकचरा व्यवस्थापन (SWM) अधिक प्रभावीपणे राबविल्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा साचण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी […]Read More
मुंबई, दि. १७ : भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला, सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला व त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण […]Read More