Month: February 2026

पश्चिम महाराष्ट्र

किस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग येथे KeyFest 2026 उत्साहात संपन्न

पुणे, दि २४: किस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे वार्षिक महोत्सव “KeyFest 2026” अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा बहुआयामी महोत्सव सांस्कृतिक, क्रीडा तसेच राष्ट्रीय अभिमान जागवणाऱ्या उपक्रमांनी समृद्ध ठरला. या मुख्य महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम “Encore 2026” आणि क्रीडा स्पर्धा “Key Karandak 2026” यांचे […]Read More

राजकीय

ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द करण्यासाठी कायद्यात सुधारणा

मुंबई दि २४ : राज्यात डान्सबार बंदी घालण्यात आली होती तो कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला, मात्र त्यानंतर ऑर्केस्ट्रा बार बाबत केलेले नियम लागू करण्यात आले आहेत, तरीही या नावाने डान्सबार चालवले जात असल्याच्या तक्रारींवर तपासणी करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. हा प्रश्न सुभाष देशमुख […]Read More

आरोग्य

धर्मादाय रुग्णालयांवर निर्बंधांसाठी कायद्यात सुधारणा

मुंबई दि २४ : राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व आरोग्यविषयक योजना राबवाव्याच लागतील आणि यासोबतच याच अधिवेशनात कायद्यात बदल करणारं विधेयक आणून त्यांनी धर्मादाय रुग्णांवर खर्च करण्यासाठी राखीव असणारी रक्कम जाहीर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. याबाबतचा […]Read More

महानगर

भायखळा येथे संत गाडगे महाराज यांची जयंती जल्लोषात

मुंबई, दि २३श्री संत गाडगे महाराज 150 व्या जयंतीनिमित्त श्री गाडगेबाबा धर्मशाळा, भायखळा येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्यायंदाचे वर्ष श्री संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे 150 वे वर्षी असल्यामुळे बाबांच्या जयंती निमित्त शासनाकडून सर्व जिल्ह्यांमध्ये बाबांची जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरी होत […]Read More

ट्रेण्डिंग

गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची परवानगी बंधनकारक

गांधीनगर, दि. २३ : गुजरात सरकारने विवाह नोंदणीसंदर्भात महत्त्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत. या नव्या नियमांनुसार प्रेमविवाहासाठी आई-वडिलांना अनिवार्यपणे माहिती देणे बंधनकारक ठरणार आहे. म्हणजेच, आता गुपचूप किंवा घरच्यांना न सांगता लग्न करणे कठीण होणार आहे. विवाह नोंदणीपूर्वी पालकांना नोटीस पाठवली जाईल आणि त्यांची संमती घेणे आवश्यक ठरेल. या निर्णयामागे सरकारचे म्हणणे आहे की अशा […]Read More

मनोरंजन

धर्मेंद्रचा अखेरचा चित्रपट OTT वर

मुंबई, दि. 23 : दिवंगत अभिनेते धर्मेद्र यांचा अखेरचा चित्रपट इक्कीस 26 फेब्रुवारीला Prime Video वर दाखल होत आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा हा युद्धपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1971 च्या बसंतरच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर कथा उलगडते. चित्रपटात युद्धदृश्यांबरोबरच वडील ब्रिगेडियर मदन लाल खेतरपाल आणि पाकिस्तानातील ब्रिगेडियर जान मोहम्मद निसार यांच्यातील भावनिक […]Read More

ट्रेण्डिंग

युजर्सच्या संमतीशिवाय डेटा शेअरिंग नाही – न्यायालयाच्या आदेशाने वरमले WhatsApp

नवी दिल्ली, दि. २३ : देशातील कोट्यवधी WhatsApp युजर्ससाठी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्यानंतर आता स्पर्धा आयोगाने (CCI) दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यास WhatsApp सहमती दर्शवली आहे. म्हणजेच, आता युजर्सना त्यांचा वैयक्तिक डेटा इतर मेटा (Meta) प्लॅटफॉर्म (इंस्टाग्राम, फेसबुक) वर शेअर करायचा की नाही याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. WhatsApp आणि मेटा Meta यापूर्वी या आदेशाविरोधात […]Read More

मराठवाडा

मंडप उभारून परीक्षा घेतल्याने केंद्र प्रमुख निलंबीत

बीड, दि. २३ : मंडप उभारून १० वीची परीक्षा घेणं बीडमधील केंद्रप्रमुखांना चांगलं भोवल आहे. शिक्षण विभागानं केंद्रप्रमुखांचं निलंबन केल आहे. कुर्ला या ठिकाणी यशवंत विद्यालयात जागे अभावी आणि अचानक विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे कारण देत केंद्रप्रमुखानं थेट शाळेच्या टेरेसवर मंडप उभारून विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने कारवाईचे आदेश दिले. […]Read More

पर्यावरण

मुसळधार अवकाळी पावसाने विदर्भ, मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान

मुंबई, दि. 23 : दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील फेब्रुवारी महिन्यातील अवकाळा पावसाने राज्याच्या विविध भागांमध्ये हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. लातूरमध्ये विजेच्या कडकडाटासह गारपिटही झाली. बीडमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागाने 23 आणि 24 […]Read More

राजकीय

आरक्षणाचा मुद्दा निकालात निघेपर्यंत उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका नाही

नवी दिल्ली, दि. २३ : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीवर मनाई कायम ठेवली आहे. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानुसार राज्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास […]Read More