Month: February 2026

सांस्कृतिक

महाशिवरात्री निमित्त सोमेश्वरवाडी येथील श सोमेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

पुणे, 5 : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. या भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व भक्तीमय वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता व साफसफाई अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे स्वच्छता अभियान रविवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता […]Read More

पर्यावरण

कोळसा खाणीत भीषण स्फोट, 16 मजूरांचा मृत्यू

शिलाँग,दि. ५ : मेघालयच्या पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यात गुरुवारी एका ‘अवैध’ कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान १६ मजूर ठार झाले असून, इतर अनेक जण अडकल्याची भीती आहे, असे पोलीस महासंचालक आय नोंगरांग यांनी सांगितले. बचाव पथके शोधकार्य करत आहेत, असे त्यांनी सांगितले. ही घटना सकाळी थांगस्कू परिसरात घडली, असेही त्यांनी नमूद केले. या स्फोटामुळे मजुरांची […]Read More

महानगर

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन

मुंबई, दि. ५ : चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, बोरीवली यांचे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन रविवार, दिनांक 8 फेब्रुवारी, 2026 रोजी ज्येष्ठालय सभागृह, बाभई, बोरीवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आले आहे. या संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात वित्तीय गुंतवणूकविषयक व्याख्यान तसेच ज्ञातीतील कलाकारांचा ‘गीतों का कारवाँ ‘ हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा […]Read More

राजकीय

राज्य निवडणूक आयुक्तांची ‘राष्ट्रीय परिषद’ २४ फेब्रुवारीला नवी दिल्लीत

मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) वतीने राज्य निवडणूक आयुक्तांची (State Election Commissioners – SECs) राष्ट्रीय परिषद २४ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आली आहे. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील राज्य निवडणूक आयुक्त या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, ही राष्ट्रीय परिषद २५ वर्षांहून अधिक कालावधीनंतर […]Read More

महानगर

करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण

मुंबई, 5करी रोड येथील महादेव पालव मार्गावरील पदपथावर मध्यभागी इमर्जन्सी अग्निशमन पाण्याचे हायड्रेल असल्याने पादचाऱ्यांना ये जा करणे फार त्रासदायक झाले आहे. फोनवर बोलताना तसेच लक्ष नसताना चालताना हे हायड्रेल पायामध्ये अडकून अपघाताच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. करी रोड, लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणात होलसेल मार्केट असल्याने या ठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. […]Read More

आरोग्य

विक्रोळी येथे आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

मुंबई : 5 – हुमाना पीपल टू पीपल इंडिया आणि मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या प्रकल्प निरामया मार्फत विक्रोळी इस्ट येथील कन्नमवार नगर २, दाजी वाडा येथे आयोजन करण्यात आले होते.या वेळी या शिबिरात गर्भाशयाच्या मुखाची तपासणी, स्तन तपासणी, व रक्तदाब तपासणी मधुमेह अशा विविध चाचण्या करण्यात आल्या. यावेळी महिला व […]Read More

राजकीय

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांचे वर्तन पक्षपाती – खासदार . वर्षा

नवी दिल्ली, 5 लोकसभेतील कामकाज बंद पाडण्यात सत्ताधारी पक्षच आघाडीवर आहे. विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, त्यांचे माईक बंद केले जातात. सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम आणि विरोधकांसाठी वेगळे नियम आहेत असे चित्र आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असताना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सातत्याने बोलण्यापासून रोखत होते, त्यांचा माईक बंद करत होते. पण भाजपा खासदार […]Read More

महानगर

8 फेब्रुवारी पासून राणीबागेत पुष्पोत्सव

मुंबई,5बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी ते रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत ‘मुंबई पुष्पोत्सव’ भरविण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (उद्याने) श्री. अजितकुमार […]Read More

आरोग्य

व्यावसायिक वाहन चालकांसाठी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया

पुणे, 5 : वाहनचालकांच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एएसजी आय हॉस्पिटल, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर तसेच कोकणे चौक, पिंपळे सौदागर (पिंपरी चिंचवड) येथे चालक दृष्टी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम २० जानेवारी पासून सुरु झाली असून ११ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे.या विशेष उपक्रमांतर्गत सर्व व्यावसायिक वाहनचालकांसाठी (ऑटो, ट्रक, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

‘व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2026’ची घोषणा

पुणे, 5 : भारतातील पहिली डॉक्टर-सेलिब्रिटी टी-20 लेदर बॉल क्रिकेट लीग असलेल्या व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग (WCCL) 2026 ची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. “जिथे आरोग्यसेवा, क्रिकेट आणि ग्लॅमर एकत्र येतात” या संकल्पनेवर आधारित ही अनोखी लीग डॉक्टरांच्या कर्तृत्वाला सन्मान देतानाच दर्जेदार क्रिकेट मनोरंजन देणार आहे अशी माहिती या लीगचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सचिन […]Read More