Month: February 2026

ट्रेण्डिंग

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ वर या गाड्यांना No Enrty

मुंबई, दि. ७ : गेल्या आठवड्या अखेरीस मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ज्वालाग्रही गॅस टँकरच्या उलटण्यामुळे ३६ तासांच्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीत हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी आता या महामार्गाचा धसकाच घेतला आहे. या मार्गावर सातत्याने असणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी विविध उपाय शोधले जात आहेत. मिसिंग लिंकमुळे या वाहतूक कोंडीवर काहीसा दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाकडून […]Read More

अर्थ

RBI या ग्राहकांना देणार 25 हजार रुपयांपर्यतची भरपाई

मुंबई, दि. ७ : डिजिटल फ्रॉडमुळे धास्तावलेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा देणारा निर्णय RBI ने घेतला आहे. डिजिटल फसवणुकीचा बळी ठरलेल्या बँक ग्राहकांना आता 25 हजार रुपयांपर्यतची भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केली. विशेष म्हणजे, ग्राहकाने चुकून आपला OTP शेअर केला असेल, तरीही ही भरपाई मिळणार आहे. RBI कडील […]Read More

महानगर

समृद्धी महामार्गावर दहा दिवस विविध वाहतूक निर्बंंध

नागपूर, दि. ७ : नागपूर समृद्धी महामार्गावर विविध कामांनिमित्त वाहतूकीवर निर्बंध लावण्यात येणार आहेत. ९ ते १८ फेब्रुवारीदरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक थांबवली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिली आहे. विशेषतः बुलढाणा आणि जालना परिसरातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांनी या वाहतूक बंदची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महामार्गावर हायवे ट्रॅफिक […]Read More

महानगर

शिवडी येथील टी जे रोडवरील विविध समस्यांबाबत उच्चभ्रू सोसायटीतील रहिवासी

मुंबई प्रतिनिधीशिवडी येथील टी जे रोड वरील अनधिकृत फेरीवाले अनधिकृत पार्किंग यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिक स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. वारंवार स्थानिक पोलीस प्रशासन वॉर्ड ऑफिस स्थानिक आरटीओ प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विनंती करून बैठका घेऊन अर्ज देऊनही यावर कार्यवाही होत नाही आहे. दिवसेंदिवस नवीन बांधकामे कन्स्ट्रक्शन रहिवासी संकुले यांचे नवीन प्रोजेक्ट उभे […]Read More

महानगर

*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाठबळामुळे तृतीयपंथीयांच्या पंखांना बळ; काळा घोडा महोत्सवात ‘उमंग’

मुंबई प्रतिनिधीसमाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या घटकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध योजना सातत्याने अंमलात आणत असते. याच अनुषंगाने मुंबईतील प्रसिद्ध ‘काळा घोडा’ कला महोत्सवात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागातर्फे स्थापित करण्यात आलेल्या ‘उमंग’ या तृतीयपंथी बचत गटाच्या दालनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘उमंग’ बचत गटाने हस्तकलेच्या वस्तू तयार केल्या आहेत. काळा घोडा उत्सवात […]Read More

महानगर

भाजपच्या नगरसेविका रितू तावडे मुंबईच्या नव्या महापौर

मुंबई दि ७ : मुंबईच्या महापौरपदाचा संभ्रम संपला असून भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांच्या नावावर भाजप नेतृत्वाने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयातून या नावाची अधिकृतपणे घोषणा केली त्यानंतर तावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडीमुळे तब्बल २९ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर विराजमान […]Read More

महानगर

डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर

मुंबई, दि. ७ : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची स्थापना करुन मुंबईत गुजराती समाज बांधवांना विविध व्यासपीठ उपलब्ध करुन देणारे, मराठी आणि गुजराती साहित्य निर्मिती मध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच सुमारे ६० वर्षांहून अधिक काळापासून कच्छशक्ती नियतकालिक अखंडपणे प्रकाशित करणारे डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ हे नाटक मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ […]Read More

ट्रेण्डिंग

एकोणीस वर्षांखालील पुरुष क्रिकेट टीम ने जिंकला सलग सहाव्यांदा विश्वचषक

झिम्बाँब्बे, दि. ६ : भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने इंग्लंडचा दणदणीत पराभव करत विश्वचषकाचा अंतिम सामना तब्बल100 धावांनी विश्वचषक जिंकला. याच बरोबर भारतीय संघाने सलग ६ व्यांदा विश्वचषक जिंकण्याचा विक्रमही केला आहे.या सामन्याचे कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत भारताने 411 धावा केल्या. लक्ष्यप्राप्ती करताना इंग्लंडला फक्त 311 […]Read More

देश विदेश

UPSC परीक्षेच्या नियमात मोठे बदल

नवी दिल्ली, दि. ६ : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC)२०२६ च्या नागरी सेवा पूर्व परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यामध्ये सेवांतर्गत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. विशेषतः जे उमेदवार आधीच आयएएस (IAS), आयपीएस (IPS) किंवा आयएफएस (IFS) म्हणून नियुक्त झाले आहेत, त्यांच्यासाठी परीक्षेला पुन्हा बसण्याच्या संधी आता मर्यादित करण्यात आल्या आहेत. यूपीएससीने स्पष्ट […]Read More

देश विदेश

इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी

इस्लामाबाद, दि. ६ : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आज शुक्रवारच्या नमाजादरम्यान एका शिया मशिदीत आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले, ज्यात किमान ३१ लोकांचा मृत्यू झाला आणि १६९ जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अलिकडच्या वर्षांत या समुदायाला लक्ष्य करून केलेल्या सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी हा एक आहे. पोलिसांनी एका निवेदनात सांगितले की, हा शक्तिशाली स्फोट इस्लामाबादच्या […]Read More