Month: February 2026

देश विदेश

भारतीय मजदूर संघाचे २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन पुरी येथे

ओडिशा, दि 9भारतीय मजदूर संघाचे (BMS) तीन दिवसीय २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन धर्मनगरी जगन्नाथ पुरी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले. ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील विविध क्षेत्रांतील हजारो प्रतिनिधींनी सहभाग घेतला. अधिवेशनात कामगारांच्या हिताशी निगडित गंभीर राष्ट्रीय प्रश्नांवर सखोल चर्चा व मंथन करण्यात आले.अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात अखिल […]Read More

राजकीय

शरद पवारांची तब्येत बिघडली; उपचारासाठी रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

पुणे दि ९ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने शरद पवार हे उपचारासाठी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाले आहेत. तिथे त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. रूबी हॉल क्लिनिकचे ज्येष्ठ डॉक्टर डॉ. सायमन ग्रँट हे शरद पवार यांच्यावर […]Read More

महानगर

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात उद्या दिनांक ६

मुंबई, दि ८*बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुष्पोत्सव भरविण्यात येत असतो.*दरवर्षी हा उत्सव एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो. यंदाच्या पुष्पोत्सवात संगीत विश्वातील विविध वाद्यांची प्रतिकृती विविधरंगी पाना-फुलांनी साकारण्यात येणार आहे.* दिनांक ६ ते ८ फेब्रुवारी या तीन दिवसात दररोज सकाळी आठ ते रात्री आठ रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला […]Read More

पर्यावरण

ठाण्यात झाडांवर रोषणाई म्हणजे पर्यावरणावर थेट हल्ला!

ठाणे, दि 8ठाणे शहरात उत्सव, कार्यक्रम व तथाकथित सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जिवंत झाडांवर विद्युत रोषणाई, वायरिंग व जड साहित्य लावले जात आहे. ही कृती सौंदर्यीकरण नसून झाडांवरील अमानुष हिंसा आहे. झाडे सजावटीचे खांब नाहीत; ती शहराचा श्वास आणि नागरिकांचा प्राणवायू आहेत.*या प्रकारामुळे झाडे जखमी होत असून पक्षी, कीटक व जैवविविधता नष्ट होत आहे. एका बाजूला शासन […]Read More

राजकीय

नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या

मुंबई, दि 8बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आत्ताच पार पडली. त्यातच अनेक महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवारी ही ठरले. त्यातच निवडून आलेले नगरसेवक नागरी समस्या सोडवण्यासाठी नवनवीन डिजिटल प्लॅटफॉर्म उपयोगात आहे. नागरिकांची संपर्क करावा म्हणून शिवसेनेच्या परळ येथील नगरसेविका माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी क्यू आर कोड च्या माध्यमातून नागरी समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी […]Read More

सांस्कृतिक

महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद

पुणे, दि. ८ : सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ 2025 मधील अनुभवाच्या आधारे नाशिक कुंभमेळा कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. साधारणत दररोज सुमारे एक लाख भाविक येथे येण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी […]Read More

ऍग्रो

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कपाशीला 8 हजारापर्यंत दर

अकोला दि ८ : विदर्भातील कपाशीची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कपाशीला प्रतिक्विंटल 8 हजारांपर्यंत दर मिळत असून शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुलढाणा अकोला अमरावती व मध्यप्रदेशातील कपाशी विक्रीसाठी येत असते यावेळी बाजार समितीच्या तुलनेने खाजगी विक्रेत्यांकडेही कपाशीला चांगला दर मिळत असल्यामुळे शासनाने जाहीर […]Read More

राजकीय

RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती

मुंबई, दि. ७ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षांनिमित्त मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेता सलमान खान उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना आरएसएसचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित केले. वरळीच्या नेहरु सेंटर सभागृहात या दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन […]Read More

ट्रेण्डिंग

नेदरलँडचा महापौर आईच्या शोधात नागपूरात दाखल

नागपूर, दि. ७ : नागपूरमध्ये अगदी एखाद्या चित्रपटातील वाटावी अशी घटना घडली आहे. चाळीस वर्षांपूर्वी अनाथ असल्यामुळे नागपूरमधुन नेदरलँड सारख्या समृद्ध देशात एक नवजात बालक दत्तक देण्यात आले होते. तिच व्यक्ती आज मोठे यश मिळवून नेदरलँडमध्ये महापौर झाले आहेत. तरीही त्यांना आपल्या मातेची आणि मातृभूमीची ओढ लागली होती. आपल्या आईच्या शोधात ते नागपूरात दाखल झाले […]Read More

देश विदेश

भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार

मॉरिशस, दि. ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मलेशियात दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पोहोचले, आठ वर्षांनंतर हा त्यांचा पहिलेच दौरा आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी त्यांच्या कारमधून विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी क्वालालंपूरमधील भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले,” पंतप्रधान अन्वर इब्राहिम स्वतः विमानतळावर माझे स्वागत करण्यासाठी आले होते. त्यांनी मला […]Read More