Month: February 2026

देश विदेश

‘वंदे मातरम’ साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्ली, दि. ११ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम्’ या गीताला ७ नोव्हेंबर २०२५ मध्ये १५० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने केंद्र सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील सर्व शासकीय कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ वाजवणे बंधनकारक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘जन गण मन’ या […]Read More

आरोग्य

शासकीय रुग्णालयांमधील मोफत उपचार होणार बंद…

मुंबई, दि. ११ : राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील संपूर्ण मोफत उपचारांची योजना अवघ्या अडीच वर्षांत मागे घेण्यात आली असून आरोग्य विभागाने उपचारांसाठी नवीन शुल्कदर लागू केले आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार ओपीडी तपासणीपासून विविध तपासण्या, शस्त्रक्रिया, आयसीयू, डायलिसिस, रुग्णवाहिका आदी सेवांसाठी निश्चित शुल्क आकारले जाणार आहे. मात्र ही शुल्कवाढ फार […]Read More

पर्यटन

ST प्रवासासाठी लागू होणार ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्यात येणार असून, विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड आता अनिवार्य असेल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. नवीन कार्डसाठी १९९ रुपये मोजावे लागतील. मात्र, ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांना आता NA परवानगीची गरज नाही

मुंबई, दि. ११ : जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून आता शेतकऱ्यांना बिगर कृषी (NA) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही.आता बांधकाम आराखडा मंजुरीलाच NA मानले जाणार आहे. सरकाच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जमीन महसूल कायद्यात […]Read More

ट्रेण्डिंग

लेबर कोडमध्ये चित्रपट कलाकारांसाठी स्वतंत्र Rulebook

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र सरकार नवीन कामगार संहितेनुसार चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करेल जेणेकरून त्यांचे हित जपता येईल, अशी माहिती आज राज्यमंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. चित्रपट कलाकारांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या कामगार मंत्र्यांनी सांगितले की, प्रस्तावित नियमावलीचा मसुदा तयार केला जाईल आणि कला क्षेत्रातील तज्ज्ञ आणि भागधारकांकडून सूचना मागवल्या […]Read More

ऍग्रो

RBI बदलणार किसान क्रेडीट कार्डसाठीचे नियम

मुंबई, दि. ११ : देशातील शेतकर्‍यांना जलद आणि सहज कर्ज सुविधा देण्यासाठी RBI ने किसान क्रेडिट कार्ड योजनेत मोठा बदल करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक कर्ज मिळण्याची शक्यता आहे. तसेच परतफेडीचा कालावधी सुद्धा अधिक असण्याची शक्यता आहे. RBI आता बँकांना इंटीग्रेटेड आणि अपडेटेड मार्गदर्शक सूचना देणार आहे. त्यामुळे कृषी कर्जाचे स्वरुप, मंजूरी आणि वापर याची […]Read More

ट्रेण्डिंग

भारतातील सर्वांधिक लांबीचा भूकंपरोधक पूल या राज्यात

नवी दिल्ली, दि. 11 : आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीला जोडणारा पहिला 6-लेन एक्स्ट्राडोसेड पूल किंवा ‘महासेतू’ तयार झाला आहे. हा भारतातील सर्वात लांब एक्स्ट्राडोसेड पूल असेल. हा पूल भूकंप-प्रतिरोधक तंत्रज्ञानाने डिझाइन केला आहे आणि त्याचे अंदाजित आयुष्य 100 वर्षे आहे. आसामचा हा प्रदेश भूकंप झोन-6 मध्ये येतो, त्यामुळे पुलामध्ये विशेष पेंडुलम प्रणाली […]Read More

राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सेल कडून अजितदादा पवार यांना

मुंबई, दि ११- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली. या बैठकीत राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याबाबत एकमताने निर्धार करण्यात आला आहे. “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे अजितदादा पवार यांचे ध्येय पुढे नेण्यासाठी मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा […]Read More

महानगर

भारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

मुंबई, दि. ११: मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्त्याला (कोस्टल रोड) आता नवी ओळख मिळाली आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा मार्ग आता देशातला सर्वांत पहिला संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या रस्त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमरसन्स गार्डन जवळ करण्यात […]Read More

पर्यावरण

देशातील पहिल्या ‘ मुंबई क्लायमेट वीक’चे 17 ते 19 फेब्रुवारी

मुंबई, दि. ११ : हवामान बदलाच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर भारतातील पहिला मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्ल्यू) १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान नेतृत्वाचा नवा मंच उभारला जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या क्लायमेट वीकच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील शासन नेते , उद्योग क्षेत्रातील प्रमुख, हवामान तज्ज्ञ, […]Read More