नवी दिल्ली, दि. 12 : वंदे मातरम या गीताची सहा कडवी गाणे बंधनकारक करण्याबरोबरच काल केंद्र सरकारने याबाबतची नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सरकारच्या या आदेशाबाबत शीख संघटना दल खालसाने तीव्र आक्षेप घेतला आहे आणि याला शीख ओळख व धार्मिक भावनांच्या विरोधात म्हटले आहे. दल खालसाचे नेते कंवरपाल सिंग बिट्टू यांनी निवेदन जारी करत […]Read More
मुंबई दि १२ :- राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील 5 हजार 12 रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]Read More
पुणे, दि १२: काश्मीर आणि महाराष्ट्र यांचे नाते केवळ पर्यटनापुरते मर्यादित नसून ते आपुलकी, विश्वास आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक आहे, असे मत काश्मीर आयकॉन संघटनेने व्यक्त केले आहे. पुण्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात काश्मीर आयकॉनने पुणेकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत काश्मीर पर्यटनाच्या पुनरुज्जीवनासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन केले आहे. यावेळी काश्मीर आयकॉनचे व्यवस्थापकीय संचालक […]Read More
मुंबई, दि. ११ – मुंबई उपनगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री खुलेआम होत असून ईशान्य मुंबई परिसर डंम्पिग ग्राऊंड झाला आहे. प्रदुषणाच्या विळख्यामुळे हे शहर आता राहणे योग्य राहिले नाही. शहरातील डम्पिंग ग्राऊंड मधील वैद्यकीय कच-यातून विषारी वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने स्थानिक नागरीकांचे आयुमान कमी झाली आहे. स्थानिकांना विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांनी ग्रासले असून […]Read More
मुंबई, दि १२काळाचौकी येथील आंबेवाडी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनांच्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे तरी हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवासी दुकानदार आणि पादचारी करत आहेत. काळ चौकी येथील हा रस्ता अतिशय अरुंद असून या ठिकाणी रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. तसेच अनेक […]Read More
मुंबई, दि १२: जगभरात हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असताना, प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कौशल छत्रपती यांनी “हार्टस्ट्रॉंग (Heartstrong)” हे नवे पुस्तक प्रकाशित केले आहे. सर्वसामान्य वाचकांसाठी तयार केलेले हे पुस्तक हृदयाच्या आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करून योग्य माहितीच्या आधारे त्याबाबत जागरुकतेचे काम करते. आपत्कालीन स्थिती उद्भवण्यापूर्वी योग्य निर्णय घेता यावा, हा या पुस्तकाचा […]Read More
मुंबई, दि १२कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ सिझन सहा मधून ज्या पद्धतीने आपल्याला काढण्यात आले ती पद्धत केवळ अन्यायकारक नसून जाणून-बुजून केलेल्या भेदभावाचा आणि अपमानाचा स्पष्ट नमुना आहे अशा शब्दात या कार्यक्रमातील आघाडीची स्पर्धक दिव्या शिंदे हिने नुकतीच मुंबईतील प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर बोलताना तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.या वेळी तिच्यासोबत लोकांचे दोस्त […]Read More
पुणे, दि १२– पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी स्थापन केलेल्या ‘वनराई’ संस्थेतर्फे दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘वनराई पर्यावरण बालोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे येथे सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत हा कार्यक्रम होणार असून ‘नाळ’ चित्रपटातील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध बालकलाकार श्रीनिवास पोकळे प्रमुख उपस्थिती दर्शविणार आहेत. […]Read More
वाशीम दि १२ (राम धनगर ): कोकण किनारपट्टी व सह्याद्रीच्या सदाहरित जंगलांमध्ये आढळणारा रानमेवा म्हणून ओळखला जाणारा पान जांभूळ (वॅक्स अॅपल) अर्थात जांभ आता वाशीमच्या उष्ण कटिबंधीय वातावरणातही बहरला आहे. जिल्ह्यातील शिरसाळा येथील प्रयोगशील शेतकरी दत्तराव इंगोले यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात वॅक्स अॅपलची यशस्वी लागवड करून आर्थिक प्रगतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. दत्तराव […]Read More
अहिल्यानगर, दि. ११ : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने आधुनिक युगाला साजेसा असा एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. सौंदाळा गावाच्या ग्रामसभेत सरपंच शरद आरगडे यांनी जात हद्दपार करण्याचा, म्हणजेच जातमुक्त गावाचा ठराव मांडला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी कोणताही विरोध न करता या ठरावाला संपूर्ण पाठिंबा दिला. गावातील सर्व नागरिक समान असून, ‘माझी जात – […]Read More