Month: February 2026

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली अबू सालेमची मुदतपूर्व सुटकेची याचिका

नवी दिल्ली, दि. १६ : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधारांपैकी एक गुंड अबू सालेम याला सर्वोच्च न्यायालयाने आज चांगलेच फटकारले आहे. आपली २५ वर्षांची कारावासाची शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा करत सालेमने सुटकेसाठी केलेली याचिका न्यायालयाने पूर्णतः फेटाळून लावली आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने शिक्षेच्या सवलतीवरून सालेमच्या वकिलांना चांगलेच फैलावर घेतले आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ […]Read More

राजकीय

नगरसेवक तेजिंदर सिंग तीवाना यांची स्थायी समिती सदस्य पदी निवड

मुंबई, दि १६भारतीय जनता पार्टी सर्व स्तरांवर युवांची भूमिका सुनिश्चित करत त्यांना नेतृत्व व कार्य करण्याच्या संधी देत आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्येही पक्षाने युवा चेहऱ्यांना उमेदवारी देत संघटनेची युवा दृष्टी अधिक बळकट केली आहे. याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांची “स्थायी समिती सदस्य” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सक्रिय जनसंपर्क, […]Read More

महानगर

काळा घोडा कला महोत्सवात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बचत गटांची ‘दिवाळी’

मुंबई, दि १६९ दिवसांत ८.५४ लाख रुपयांची विक्रमी उलाढाल*मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेला काळा घोडा कला महोत्सव २०२६ मध्ये यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या पुढाकारातून सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. […]Read More

महानगर

एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकांसाठी सदस्य न्यायालयात

मुंबई, दि १६आर्थिक बेशिस्तीला लगाम, गैरव्यवस्थापनाला पूर्णविराम आणि वैचारिक अस्पृष्यतेची हकालपट्टी या मुद्द्यांना धरून ‘एशियाटिक टुमॉरो’ या नावाने एकत्र आलेल्या सदस्यांनी एशियाटिक सोसायटीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सोसायटीच्या अवैधरित्या प्रलंबित निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत, अशी माहिती सोसायटीचे माजी उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आज येथे दिली.एशियाटिक सोसयटीच्या व्यवस्थापनाने निवडणुका एकतर्फी निर्णय घेत […]Read More

राजकीय

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची आर. टी. ई. २५ टक्के

मुंबई, दि १६“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आर. टी. ई.) अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होणार आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी दुर्बल वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमधील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने […]Read More

महानगर

तामिळनाडुच्या विकासासाठी अभिनेते विजय यांनी एनडीए मध्ये यावे – केंद्रीय

मुंबई, दि १६- दाक्षिणात्य अभिनेते विजय यांनी तामिळनाडुतील हितासाठी राजकीय पक्ष काढलेला आहे. अभिनेते विजय थलपती यांची दक्षिणेत अफाट लोकप्रियता आहे. त्यांनी राजकीय पक्ष काढुन निवडणुका लढणे योग्य ठरणार नाही. तामिळनाडुच्या विकासासाठी अभिनेते विजय यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए मध्ये यावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले […]Read More

साहित्य

रमाई ते दृष्टी : प्रा. आशालता कांबळे यांच्या तीन पुस्तकांचे

मुंबई, दि १६: ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, समीक्षिका आणि फुले–आंबेडकरी चळवळीतील तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या प्रा. आशालता कांबळे यांच्या तीन महत्त्वपूर्ण पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट यांच्या वतीने होणार आहे. या सोहळ्यात ‘रमाई […]Read More

महानगर

प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होणार- कौशल्य विकास मंत्री श्री.

मुंबई, दि १६ उद्योग समूह आणि लघु उद्योगांना लाभदायक ठरणारी देशातील पहिली ‘ए आय लिविंग लॅब” महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या लॅब चे आज महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयात उदघाटन करण्यात आले. जर्मनीच्या सहकार्याने रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा हा अभिनव उपक्रम आहे. जर्मनीच्या […]Read More

राजकीय

औंध-बोपोडी प्रभागात स्वच्छता मोहिमेचा शानदार शुभारंभ, नगरसेवक सनी निम्हण यांचा

पुणे, दि १६ आदर्श घेऊन महापुरुषांचा, संकल्प करू स्वच्छतेचा! छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला कल्याणकारी राज्याचा वारसा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला देशसेवेचा संस्कार जपत, औंध-बोपोडी प्रभागात ‘महापुरुषांना स्वच्छांजली’ या अभिनव मोहिमेचा आज १६ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात शुभारंभ करण्यात आला.प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकाराने ही मोहीम शिवजयंती ते भीमजयंती […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे, दि १६: पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिसर स्वच्छता व पाहणीसाठी विशेष संयुक्त मोहीम (ड्राईव्ह) राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व विभागांचे प्रमुख, वार्ड अधिकारी नायकर यांच्यासह आरोग्य, अतिक्रमण, विद्युत, उद्यान तसेच ड्रेनेज विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. ही पाहणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते राजर्षी शाहू […]Read More