मुंबई दि २२ : उद्यापासून मुंबईत सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमात उपस्थित एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि सत्तारूढ पक्षातील आमदार दिसत आहेत.ML/ML/MSRead More
पुणे, २२:* मी आयुष्यभर हजारो रोमँटिक गाणी लिहिली आहेत. आशिकी, राजा हिंदुस्तानी, साजन, दिवाना, कुछ कुछ होता है या चित्रपटांतील गाणी आजही रसिकांकडून आवडीने ऐकली आणि गायली जातात. माझा चेहरा तितकासा परिचित नसला तरी मी लिहिलेली गाणी आणि त्या गाण्यांच्या ओळी आजच्या नवयुवकांच्या काळजाचाही ठाव घेतात. त्यामुळे, जोपर्यंत माझ्या लिखाणात रसिकांच्या काळजाला स्पर्श करण्याची ताकद […]Read More
पुणे, २२ फेब्रुवारी 2026 : जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन रविवार, 22 फेब्रुवारी 2026, सकाळी […]Read More
मुंबई, २२महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्याक विकास विभाग तसेच राज्यस्तरीय समागम समितीद्वारा ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागमचे दिनांक २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनप्रवासावर आधारित गीताचे मुंबईतील ७ लाख १४ हजार ६२६ विद्यार्थी सोमवार, दिनांक […]Read More
मुंबई, दि.२२ – राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करत, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या अधिकृत चहापानावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आहे. मंत्रालयात उघडपणे सुरू असलेले ‘लक्ष्मीदर्शन’, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आणि घटनात्मक पदांचा होणारा अवमान या मुद्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा घातपात की […]Read More
मुंबई दि २२ — सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता ‘लालपरी’ च्या चाकांनी मोजले जाणार आहे! राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला. “आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,” असा […]Read More
नवी दिल्ली,दि. २१ : काश्मीरमध्ये पहलगाम येथे पाकिस्तानने पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले होते. या ऑपरेशन अंतर्गत विशेष कामगिरी केल्याबद्दल सोलापूरचे सुपुत्र सुशील गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयातील ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्स संचालनालयात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुशील गायकवाडांना भारतीय लष्कर प्रमुखांचे […]Read More
मुंबई, दि. 21 : सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने निवडक जागतिक वारसा किल्ल्यांसाठी जतन-संवर्धन आणि पर्यटकांना सोयी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारसा सुरक्षित राहण्याबरोबरच पर्यटनालाही चालना मिळणार आहे. राजगड, सांदेरी, साल्हेरछत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची पहिली राजधानी मानला जाणारा राजगड किल्ला सध्या संवर्धनाच्या मोठ्या टप्प्यात आहे. येथे 4.91 […]Read More
नवी दिल्ली, दि. 21 : नुकत्याच झालेल्या जागतिक AI परिषदेत गलगोटीया विद्यापीठाने चिनी बनावटीचा रोबो कुत्रा सादर केल्यानंतर जगभर भारताच्या AI मधील कामगिरीबद्दल शंका घेतल्या जाऊ लागल्या. या घटनेमुळे या परिषदेत आपल्या अनोख्या AI उत्पादनांसह सहभागी झालेल्या नवोदीत भारतीय संशोधकांच्या कामगिरीकडे माध्यमांचे दुर्लक्ष झाले. मात्र भारतही AI मध्ये उत्तम कामगिरी करत असल्याची ग्वाही आज समोर […]Read More
मुंबई, दि. 21 : काही महिन्यांपासून बंद असलेली मुंबई मोनोरेल आता अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज होऊन पुन्हा धावू लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नवीन रेक आणि सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीला मान्यता मिळाल्याची माहिती दिली. ही सुरक्षा मान्यता ‘ब्युरो व्हेरिटास’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देण्यात आली आहे. चेंबूर ते जेकब सर्कल या १९.५४ किमी मार्गावरील सेवा […]Read More