Month: January 2026

महानगर

सातरस्ता येथे अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिक हैराण

मुंबई, दि २५महालक्ष्मी येथील सातरस्ता परिसरामध्ये श्रीराम हॉटेल च्या बाजूला मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडल्यामुळे नागरिकांना चालणे देखील फार कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सातरस्ता येथील धोबी घाटाच्या बाजूला असणाऱ्या या पदपथावर मोठ्या प्रमाणात वडापाव, चायनिज आणि ज्यूसचे अनधिकृत स्टॉल लावले आहेत. या स्टॉलवर […]Read More

देश विदेश

महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

नवी दिल्ली दि २५ : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण 89 अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये 31 पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’ (GM), उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी […]Read More

पर्यावरण

ताडोबा-अंधारीत हिमालयीन आणि युरेशियन ग्रिफॉन गिधाडांचे दुर्मिळ दर्शन

चंद्रपूर दि २५ :–चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात हिमालयीन प्रदेशात सामान्यतः आढळणारे हिमालयीन ग्रिफॉन गिधाड आणि युरेशियन ग्रिफॉन गिधाड यांचे दुर्मिळ दर्शन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात नोंदवले गेले. पक्षी तज्ञांच्या मते, दोन्ही गिधाडे प्रौढ प्रजातीतील आहे. हिमालय, लडाख, तिबेट, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या थंड, उंच प्रदेशातील मूळ गिधाडे अत्यंत महत्त्वाची आणि असामान्य मानली जातात. तज्ञांचा असा […]Read More

राजकीय

अहो आश्चर्यम्! 10 लाख भागभांडवल असलेल्या कंपनीशी फडणवीस सरकारचा दावोसमध्ये

महाराष्ट्र सरकारच्या ड्यू डिलिजन्स” “प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह: जणू काय सायकल बनवण्याची क्षमता, अनुभव अन् इतिहास असलेल्या कंपनीशी विमाने बनवण्याचा करार? – दावोसची चमकदार घोषणा आणि अनेक गूढ प्रश्न विक्रांत पाटील स्वित्झर्लंडमधील दावोसच्या बर्फाळ वातावरणात, जागतिक आर्थिक मंचावर महाराष्ट्राच्या प्रगतीचे ढोल वाजवले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रात गुंतवणुकीचा महापूर आल्याच्या घोषणा केल्या. याच […]Read More

अर्थ

अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात तणाव; रुपयाचा नीचांक

जितेश सावंत गेल्या आठवड्यात जागतिक तसेच देशांतर्गत घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) सततची विक्री, जागतिक बाँड यिल्डमध्ये झालेली वाढ आणि अमेरिका–युरोपमधील व्यापार शुल्क (Tariffs) धोरणातील अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुपयाची ऐतिहासिक घसरण शुक्रवारी इंट्राडे व्यवहारादरम्यान भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९१.९९ च्या विक्रमी […]Read More

महानगर

परप्रांतियांमुळे मुंबईकरांना लागतो लेटमार्क…

मुंबई, दि. २३ : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षांत परप्रांतांतून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांमुळे मुंबईकरांना वारंवार लेटमार्कचा सामना करावा लागत आहे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या वेळापत्रकात एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने लोकल गाड्या उशिरा धावतात आणि प्रवाशांना कामावर पोहोचताना उशीर होतो. विशेषतः सकाळी […]Read More

महानगर

वसईतील ख्रिस्ती धर्मगुरूवर हिंदू पद्धतीने होणार अंत्यसंस्कार

मुंबई, दि. २३ : वसईचे सुप्रसिद्ध ख्रिस्ती धर्मगुरू फादर हिलरी फर्नांडिस यांचे भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८६ वर्ष होते. फादर फर्नांडिस यांनी स्वतःच्या मृत्युपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार, त्यांच्या पार्थिवावर ख्रिस्ती परंपरेप्रमाणे चर्चमध्ये दफन विधी न करता हिंदू संस्कृतीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या पाचुंदर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांचे […]Read More

ट्रेण्डिंग

१ लाखाचे कर्करोगावरील औषध मिळणार २८ हजारांना

अहमदाबाद, दि. २३ : येथील झायडस लाइफ सायन्सेसने जगातील पहिले निवोलुमॅब बायोसिमिलर औषध ‘तिष्ठा’ भारतात बाजारात आणले आहे. हे औषध मूळ ब्रँड Opdivoच्या तुलनेत एक चतुर्थांश किंमतीत उपलब्ध असून, त्यामुळे कर्करोग उपचार अधिक परवडणारे झाले आहेत. असा दावा कंपनीने केला आहे. झायडसने भारतात बायोसिमिलर औषध आणले आहे. बायोसिमिलर म्हणजे मूळ ब्रँडेड औषधासारखेच कार्य करणारे, परंतु […]Read More

क्रीडा

रोहीत शर्माला या विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट

नवी मुंबई, दि. २३ : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या रोहित शर्माला आता एक खास सन्मान मिळणार आहे. रोहित शर्माला डिवाय पाटील यूनिवर्सिटीकडून मानद डॉक्टरेट (D.Litt.) ने सन्मानित करण्यात येणार आहे. 24 जानेवारी 2026 रोजी आयोजित होणाऱ्या दीक्षांत समारोहात हिटमॅनला हा किताब मिळणार आहे. यूनिवर्सिटीकडून जाहीर करण्यात आलं की […]Read More

पर्यटन

जोरदार हिमवृष्टीमुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित

नवी दिल्ली, दि. २३ : जोरदार हिमवृष्टीमुळे माता वैष्णोदेवीची यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. खराब हवामान, घसरते मार्ग आणि यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचा विचार करता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. काल रात्रीपासून वैष्णोदेवी मंदिर परिसरात पावसासह हिमवृष्टी सुरू असून शुक्रवारी सकाळपासून बर्फवृष्टीची तीव्रता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वैष्णोदेवी यात्रेसाठी नवीन यात्रेकरूंची नोंदणी तात्काळ थांबवण्यात आली आहे. […]Read More