Month: January 2026

महानगर

निवडणूक आयोगाने नाकारले भाजपचे प्रचारगीत

मुंबई, दि. 7 : देशातील सर्वांत श्रीमंत महानगर पालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई मनपाच्या निवडणूकीसाठी सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाला तर आपण कधी एकदा मुंबईची सत्ता हाती घेतो असे झाले आहे. त्यादृष्टीने भाजप सर्वबाजूंनी मोर्चेबांधणी करत आहे. प्रचाराच्या या धामधुमीत पक्ष आणि उमेदवारांवर लक्ष ठेवून असलेल्या राज्य निवडणूक […]Read More

देश विदेश

देशातील पहिले AI क्लिनिक ग्रेटर नोएडमध्ये सुरू

नवी दिल्ली, दि. ७ : ग्रेटर नोएडा येथील शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था (GIMS) येथे देशातील पहिले सरकारी AI क्लिनिक सुरू झाले आहे. ४ जानेवारी ला या AI क्लिनिकची सुरुवात झाली. क्लिनिकमध्ये कर्करोग, हृदय, मूत्रपिंड आणि यकृत यासारख्या गंभीर आजारांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अनुवांशिक स्क्रीनिंगचा वापर केला जाईल. या […]Read More

ऍग्रो

Farmer ID शिवाय शेतकरी या योजनांपासून राहणार वंचित

मुंबई, दि. ७ : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा Farmer ID न काढल्यास भविष्यात अनेक महत्त्वाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळीच Farmer ID काढणे अत्यावश्यक ठरणार आहे. Farmer ID ऑनलाइन किंवा स्थानिक कृषी कार्यालय, सेवा केंद्र, महा-ई-सेवा […]Read More

बिझनेस

जगातील पहिला 130 इंचाचा Micro RGB TV

मुंबई, दि. ७ : SAMSUNG Electronics ने CES 2026 मध्ये जगातील पहिला 130-इंचाचा मायक्रो RGB टीव्ही लाँच केला आहे. सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात मोठा मायक्रो RGB डिस्प्ले असलेला हा टिव्ही आहे. या टीव्हीमध्ये अॅडव्हान्स्ड AI पिक्चर प्रोसेसिंग, फुल BT.2020 कलर कव्हरेज आणि नवीन फ्रेम-फोकस्ड डिझाइन आहे. यात एआय फुटबॉल मोड प्रो, एआय साउंड कंट्रोलर प्रो, लाईव्ह […]Read More

ट्रेण्डिंग

मुक्ता बर्वेचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. 7 : राष्ट्रीय पुरस्कार विजेती लोकप्रिय मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेचा ‘माया’ या नवीन चित्रपट पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटाच्या पोस्टरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. मुक्ता बर्वे ‘माया’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये मुक्तासोबत सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी हट्टंगडी आणि डॉ. गिरीश ओक अशी तगडी कलाकारांची फळी दिसतेय. या […]Read More

ट्रेण्डिंग

भारतीय भटका कुत्रा ‘आलोका’ अमेरिकेतील शांतता पदयात्रेत सहभागी

वॉशिग्टन डीसी, दि. 6 : भारतीय भटका कुत्रा ‘आलोका’ आता अमेरिकेत बौद्ध भिक्षूंनी आयोजित केलेल्या 2,300 मैलांच्या शांतता पदयात्रेत सहभागी झाला आहे. एकेकाळी भारतातील रस्त्यावर भटकणारा हा कुत्रा आज करुणा, अहिंसा आणि शांततेचा प्रतीक बनला आहे. भारतातील धुळीच्या रस्त्यावरून सुरू झालेला एका भटक्या कुत्र्याचा प्रवास आज जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. ‘आलोका’ नावाचा हा भारतीय […]Read More

ऍग्रो

संत्रा उत्पादकांसाठी 12 कोटी 38 लाखांची मदत जाहीर

नागपूर, दि. 6 : वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानासाठी सरकारनं विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. आर्वी, कारंजा व आष्टीतील शेतकऱ्यांना फडणवीस सरकारची मदत जाहीर झाली आहे. 12 कोटी 38 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्धा व नागपूर विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे. 315 गावांतील 8 […]Read More

अर्थ

SBI चे शेअर्स सातत्याने तेजीत

मुंबई, दि. ६ : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SBI शेअरमध्ये आज 13.40 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. NSE वर SBIचा शेअर 1018.90 रुपयांवर तर BSE वर 1018.75 रुपयांवर बंद झाला. मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग वॉल्यूम असल्यानं शेअरमध्ये तेजी दिसून आली. गेल्या सहा महिन्यात स्टेट बँकेच्या शेअरनं दमदार कामगिरी केली आहे. या […]Read More

पर्यटन

महाराष्ट्र दिनी सुरु होणार मुंबई-पुणे मिसिंग लिंक

मुंबई, दि. 6 : मुंबई-पुणेदरम्यान अनेक वर्ष रखडलेले दरीपूल, म्हणजेच मिसिंग लिंकचे काम आता 98 टक्के पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, लोणावळ्याजवळील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम 98 टक्के पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. “काम वेगाने सुरू […]Read More

महानगर

मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल

मुंबई, दि. ६ : मुंबईत लोकल ट्रेन मधील गर्दीचे नियोजन करण्यासाठी आता १८ डब्यांच्या लोकल सुरु करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. १८ डब्ब्यांच्या लोकल ट्रेन सुरू करण्याच्या उद्देशाने रेल्वेकडून महत्त्वाचं पाऊल टाकलं जात आहे. पश्चिम रेल्वेने जानेवारीमध्ये विरार ते डहाणू रोड सेक्शनवरील १८ डब्यांच्या ईएमयू रॅकसाठी महत्त्वाच्या आपत्कालीन ब्रेकिंग डिस्टन्स (ईबीडी) आणि कपलर […]Read More