Month: January 2026

राजकीय

पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची उद्धव ठाकरे ब्रॅण्डनेच स्थिर ठेवली

मुंबई, दि. १३ :५ डिसेंबर २०१४ ते २०१९ पर्यंत मुख्यमंत्री पदावर आपण राहिलात ते केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे ब्रॅण्ड ने दिलेल्या भरभक्कम पाठिंब्यामुळेच. कदाचित आपल्या स्मृतीपटलावर ही महत्त्वाची गोष्ट राहिलेली दिसत नाही, अशा सुस्पष्ट शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वक्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आठवण करून दिली. शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी […]Read More

राजकीय

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी न्यायालयाकडून पंधरा दिवसांची मुदतवाढ

मुंबई, दि. १२ : राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या निवडणुका पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने आयोगाला १५ दिवसांची मुदतवाढ दिली असून आता १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे निवडणुकांच्या घोषणेची प्रतीक्षा करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना आता आणखी काही […]Read More

ट्रेण्डिंग

भटक्या कुत्र्यांसाठी प्रसिद्ध गायक दान करणार १० एकर जमिन

नवी दिल्ली, दि. १२ सर्वोच्च न्यायालयाने काही काळापूर्वीच भटक्या कुत्र्यांना शहरांमधून हटवून निवारागृहात पाठवण्याचा मोठा आदेश जारी केला आहे. मात्र, यावर गायक मिका सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे की, भटक्या कुत्र्यांना त्रास होईल असा कोणताही निर्णय घेऊ नये. यासोबतच त्यांनी घोषणा केली आहे की, ते स्वतः या कुत्र्यांसाठी 10 एकर जमीन दान करतील, […]Read More

देश विदेश

ट्रम्प यांनी स्वतःला घोषित केले व्हेनेझुएलाचे अ‍ॅक्टिंग प्रेसिडेंट

न्यूयॉर्क :व्हेनेझुएलामध्ये गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकट, महागाई, आणि राजकीय अस्थिरता वाढली आहे. तेलसंपन्न असलेल्या या देशात लोकशाही व मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप अमेरिकेने वारंवार केला आहे. ट्रम्प यांच्या धोरणामागे राजकीय लोभ आणि तेलसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्याची इच्छा असल्याचे अनेक विश्लेषकांचे मत आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना काही दिवसांपूर्वीच अटक केल्यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष […]Read More

राजकीय

जुहू परिसरात ३५ हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

मुंबई, दि. १२ : निवडणूकांच्या दरम्यान दिली जाणारी वारेमाप आश्वासने आणि त्यानंतर निवडून आल्यावर कामाच्या नावाने बोंब, या देशभर बोकाळलेल्या राजकीय प्रवृत्तींच्या वागणुकीला नागरिक कंटाळून गेला आहे. याचाच प्रत्यय आता मुंबई मनपाच्या निवडणूकाच्या निमित्ताने सुरू असलेल्या रणधुमाळीत आला आहे. मुंबईतील जुहू भागातील तब्बल ३५ हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जुहू परिसरातील जवळपास […]Read More

राजकीय

लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास मज्जाव

मुंबई, दि. १२:महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. “लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट! 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे तीन हजार जमा होणार,” अशा आशयाच्या प्रसिद्ध […]Read More

देश विदेश

ट्रम्प आता पैसे देऊन ग्रीनलँड विकत घेण्याच्या तयारीत

वॉशिग्टंन डीसी, दि. १२ : जगभरातील नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध भाग येनकेन प्रकारणे ताब्यात घेण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. व्हेनेझुएलावर कारवाई करून झाल्यावर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँड खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे की या आर्क्टिक प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आर्थिक व्यवहारासोबतच लष्करी पर्यायही विचारात घेतला जात आहे. ट्रम्प […]Read More

देश विदेश

अंतराळात हरपले १६ उपग्रह, ISRO ची नवर्षातील पहिली मोहिम अयशस्वी

श्रीहरीकोटा, दि. १२ : ISRO च्या नववर्षातील पहिल्याच अंतराळ मोहिमेत मोठा धक्का बसला आहे. आज ISRO च्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV-C62) मोहिमेदरम्यान प्रक्षेपणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाला. रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात (PS3 stage) अखेरच्या क्षणी मार्गात विचलन (deviation) आढळून आले. ज्यामुळे अपेक्षित कक्षेत (ऑर्बिट) जाणे शक्य झाले नाही. परिणामी या मोहिमेत पाठवण्यात आलेले सर्व […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्र सायबरची डीपफेक क्लीप अपलोड करणाऱ्यांवर कारवाई

मुंबई, दि. १२ : मुंबईत लोकप्रिय युट्यूबर पायल गेमिंगशी संबंधित कथित डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात काही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून सार्वजनिकरीत्या माफी मागण्यास भाग पाडण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, आक्षेपार्ह डीपफेक कंटेंट अपलोड व प्रसारित […]Read More

महानगर

मंत्रालयाचे उपहारगृह : खाद्यसंस्कृतीचे आहार केंद्र…!

मंत्रालयाचे उपहारगृह हे सध्या केवळ पोट भरण्याचे ठिकाण न राहता, खाद्यसंस्कृतीचे एक समृद्ध केंद्र बनले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उसळणाऱ्या कढईतून दरवळणारा खमंग सुगंध आणि ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांचा आपुलकीने केलेला स्वीकार—येथील रोजच्या निरनिराळ्या स्वादिष्ट पदार्थांतून मनाला भारावून टाकतो. मंत्रालय म्हटले की, डोळ्यांसमोर उभे राहते ती अखंड धावपळ, टेबलावर रचलेल्या फायलींचे ढिग, वरिष्ठांचा कामाचा तगादा […]Read More