Month: January 2026

महानगर

भायखळा पूर्व येथील फेरबंदर भागात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा

मुंबई, 15भायखळा पूर्व येथील फेरबंदर येथे नागरिकांनी मतदान करण्यासाठी सकाळपासूनच लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. फेरबंदर येथे मोठ्या प्रमाणात शिवसेना आणि मनसे यामध्ये कोण विजयी होणार यासाठी जोरदार चर्चा सुरू असून त्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात सकाळीच बाहेर पडून मतदान केले. या विभागामध्ये अनेक चाळी रीडेव्हलपमेंटमध्ये गेले असल्यामुळे अनेक नागरिक पनवेल,उलवे,नवी मुंबई, विरार या ठिकाणी राहायला […]Read More

राजकीय

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार’

मुंबई, दि १५बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी – २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते. सदर पत्र तत्काळ मागे घेण्यात आले असून त्याऐवजी सुधारित पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार, गुरुवार, दिनांक १५ जानेवारी […]Read More

राजकीय

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

मुंबई, दि. १५ : बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित […]Read More

महानगर

ठाण्यात ९९ वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क

ठाणे दि १५ …ठाण्याच्या टेंभी नाका येथील परमार हाऊस मध्ये राहणाऱ्या शिव समर्थ विद्यालयाच्या माजी शिक्षिका लीला क्षोत्री वय वर्ष 99 यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सिने अभिनेता पुष्कर क्षोत्री यांच्या त्या पणजी आहेत. शाळेचा माजी विद्यार्थी दिलीप फाटक याने त्यांना आपल्या रिक्षातून जवळच असलेल्या बि.जे हायस्कूल येथील मतदान केंद्रावर नेलं. सदर मतदान केंद्रावर […]Read More

महानगर

खा.संजय पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबईकरांनी मतदानाचा हक्क बजवावा – राजुल पाटील मुंबई, दि. १५ – मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी होणा-या मतदानाला आज सुरवात झाली.ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजुल संजय पाटील या प्रभाग क्रमांक ११४ मधून निवडणूक लढवित असून त्यांनी आज सकाळी भांडुप रेल्वे स्थानकाजवळील शाळेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या […]Read More

ऍग्रो

कृषी अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला बुटाने मारहाण

वाशिम, दि. 14 : मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात एका मुजोर कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनरेगा योजनेअंतर्गत संत्री फळबागेच्या अनुदानाबाबत विचारणा केल्याने तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला. यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिन कांबळे असे मारहाण करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचे नाव […]Read More

महानगर

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज

मुंबई, दि. १४ : राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 15) मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत असून एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदारांकरिता एकूण 39 हजार 92 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात एकूण 15 हजार 908 […]Read More

ट्रेण्डिंग

तस्करीसाठी वाढला क्रिप्टोकरन्सीचा वापर – DRI चा अहवाल

नवी दिल्ली , दि. १४ : तंत्रज्ञान प्रगत होत जाते तसे गुन्हेगारही अधिक अद्ययावत राहून काम करू लागतात. असाच प्रकार आता तस्करीच्या बाबतीतही घडत आहे. Diroctaret of Revenue Intelligence ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात सोने, अमली पदार्थांच्या तस्करीसाठी cryptocurrency चा वापर अलीकडच्या वर्षांत लक्षणीयरीत्या वाढल्याचे नमूद केले आहे. यूएसडीटीसारखी स्टेबलकॉइन्स पारंपरिक हवाला नेटवर्कची जागा घेत […]Read More

अर्थ

इराणमधील अस्थिरतेमुळे भारताची बासमती निर्यात अडचणीत

नवी दिल्ली, दि. 14 : इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक अराजकतेचा थेट परिणाम भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीवर जाण्यास लागला आहे. देशांतर्गत बासमती तांदळाच्या किमतींमध्येही मोठी घसरण झाल्याचे उद्योग संघटना नमूद करत आहेत. निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार, इराणी खरेदीदारांकडून होणारे पेमेंट विलंब आणि व्यापारातील अनिश्चितता ही सध्याची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनवत आहे. इंडियन राईस एक्स्पोर्टर्स फेडरेशनने काल एक निवेदन […]Read More

महानगर

भटके कुत्रे चावल्यास राज्य सरकारला द्यावी लागणार भरपाई

नवी दिल्ली, दि.14 : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत राज्य सरकारांच्या ढिल्या कारभाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. भटक्या प्राण्यांबाबतच्या नियमांची गेल्या 5 वर्षांपासून अंमलबजावणी न झाल्याबद्दल न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली.कुत्र्याने चावा घेतल्यास, एखाद्याचा मृत्यू झाल्यास किंवा मुले आणि वृद्धांना इजा झाल्यास आता संबंधित राज्य सरकारला मोठी नुकसानभरपाई द्यावी लागेल, असे न्यायालयाने […]Read More